मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेला चित्रपट वेड याचं नुकतंच नवीन गाणं ‘वेड तुझा‘ प्रदर्शित झाला आहे. या गाण्याने सोशल मीडिवर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या गाण्याने तरुणाइवर चांगलीच भुरळ घातली आहे. त्यासोबत या चित्रपटचं दुसरं गाणं ‘बेसुरी’ नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं देखिल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया (Genelia D’Souza) यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित झालेल्या गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. IMDB या साईट वर मोस्ट ऍंटीसिपेटेड फिल्म म्हणून ‘वेड’ चित्रपट पहिल्या क्रमांकावर फिल्म ट्रेंड होत आहे. (Ved Movie Song Release,genelia d’souza Deshmukh look cute in besuri song…)
वेड चित्रपटाचं ‘बेसुरी’ हे नवीन गाणं सोमवार (दि, 5 डिसेंबर) रोजी प्रदर्शित करण्यात आले आहे. याचे गायन वसुंधरा आणि कंपोजिशन अजय-अतुल यांनी केले आहे. गाण्यामध्ये जिनेलिया शाळकरी मुलीच्या अवतारात दिसली. अभिनेत्री या अवतारामध्ये चाहत्यांचे मनं जिंकली आहेत. जिनेलियाने आजपर्यत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पुन्हा एकदा ‘वेड’ चित्रपटामधून सालसा रंग आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहे. ‘बेसुरी’ हे गणं जितकं मनाला भिडतं तेवढंच या दोघांची रुप देखिल काळजाला भिडत आहे. दोघांनी जरी 45 वी ओलांडली असली तरी त्यांना रुप शोभून दिसत आहे.
View this post on Instagram
मुंबई फिल्म कंपनीने “देश म्युजिक” लेबल द्वारे हे गाणं प्रदर्शित केले आहे. ‘वेड’ चित्रपटामध्ये गाण्यांना संगित अजय अतुलने दिले आहे त्यामुळे चित्रपटातील गाण्यांना काही तोडच नाही. प्रेक्षक आतुरतेने चित्रपटाची वाट पाहात आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘हिरो’सोबत दिसली मीनाक्षी शेषाद्री; व्यक्त केली पुनरागमनाची इच्छा
जावेद अख्तरांचं ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बाबत माेठं वक्तव्य; म्हणाले, “महिलांनाही एकापेक्षा जास्त पती…”