Saturday, April 20, 2024

अजय-अतुल परीक्षण करत असलेल्या ‘इंडियन आयडल मराठी’ शोचे सूत्रसंचालन करणार ‘ही’ अभिनेत्री

आपण नेहमीच बघत आलो आहे की अनेक हिट चित्रपटांचे विविध भाषांमध्ये रिमेक बनत असतात. विविध गाजलेल्या मालिका देखील वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवल्या जातात. मागील काही काळापासून रियॅलिटी शो देखील हिंदीसोबत वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये बनत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लवकरच हिंदी भाषेतील सुपरहिट सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल’चे मराठी व्हर्जन येणार आहे, ही बातमी सर्वाना माहित आहेच. मात्र आता या शोचे सूत्रसंचालन कोण करणार त्या व्यक्तीचे नावं जाहीर करण्यात आले आहे.

ज्या रियॅलिटी शोने हिंदीसोबतच संपूर्ण भारतातील मनोरंजनविश्वाला एकापेक्षा एक असे दर्जेदार आणि सुरेल गायक दिले त्याच इंडियन आयडलचे मराठी रूप आपण आता पाहू शकणार आहोत. या शोचे परीक्षण मराठीसोबतच बॉलिवूड गाजवलेली अजय अतुल ही जोडी करणार आहे. कोणताही रियॅलिटी शो सुरु होणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये शोसोबतच मध्ये दोन गोष्टींबद्दल जास्त आकर्षण असते. एक तर शोचे परीक्षक आणि दुसरे शोचे सूत्रसंचालक.

आता इंडियन आयडल मराठीचे परीक्षण अजय अतुल ही सुपरहिट जोडी करणार असल्याचे सर्वश्रुत आहे. आता या शोचे सूत्रसंचालन कोण करणार त्या व्यक्तीचे किंबहुना त्या अभिनेत्रींचे नाव समोर आले आहे. इंडियन आयडलचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकरवर सोपवण्यात आली आहे. ‘सिंगिंग स्टार’ या सेलिब्रिटी रियॅलिटी शोची विजेती असणारी स्वानंदी आता अजून एका नव्या भूमिकेतून सर्वांच्या समोर येणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अभिनेत्री स्वानंदी टिकेकर घराघरात पोहोचली. एक उत्तम अभिनेत्री आणि गायिका असणाऱ्या स्वानंदीला या नव्या भूमिकेत बघण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक झाले आहे. स्वानंदीने स्वतः इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. तिने एक पोस्ट शेअर करत लिहिले, “हे तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. त्याचबरोबर मी खूप उत्साही आहे..लवकरच भेटू या…’ या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार स्वानंदी टिकेकर! ‘इंडियन आयडल मराठी’! अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा! २२ नोव्हेंबरपासून, आपल्या सोनी मराठीवर.” सोनी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेर केलेली पोस्ट स्वानंदीने पुन्हा शेअर केली आहे.

स्वानंदी टिकेकरला वडील उदय टिकेकर यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला, तर आई आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याकडून गायनाचा. तिला गाण्याची उत्तम समाज आहे. आता स्वानंदी तिची हि नवी भूमिका कशी निभावते हे बघण्यासाठी सर्वच उत्साहित आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटापासून दूर असूनही तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालकीण आहे बच्चन घराण्याची सून, जाणून घ्या ऐश्वर्या रायचे नेटवर्थ

-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?

-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी

हे देखील वाचा