मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्गज उडिया अभिनेते मिहीर दास यांचे निधन झाले आहे. (Veteran Odia actor Mihir Das passes away) मिहीर दास यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी कटक शहरातील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता मिहिर दास हे किडनीच्या आजाराने ग्रस्त होते, आणि डायलिसिसवर होते. मात्र त्यांचे निधन किडनीच्या आजाराने न होता हृदयविकाराच्या तीव्र धक्याने झाले. उडिशाचे मुख्यमंत्री असलेल्या नवीन पटनायक यांनी मिहीर दास यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना लिहिले, “त्यांचे निधन म्हणजे उडिया सिनेमाजगताची न भरून येणारी क्षती आहे.”
अभिनेते मिहीर दास यांनी १९७९ मध्ये ‘मथुरा विजय’ सिनेमातून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘मु ताचे लव कारुच्ची’, ‘लक्ष्मी प्रतिमा’ आदी अनेक हिट सिनेमे दिले. मात्र मागील काही काळापासून ते इंडस्ट्रीपासून लांब होते. शेवटचे त्यांना २०१८ साली ‘ओनली प्यार में’ सिनेमात पाहण्यात आले होते. अभिनयापासून लांब गेल्यानंतर ते लाइमलाईटपासून देखील लांब होते.

मिहीर दास यांना त्यांच्या अभिनयातील योगदानाबद्दल अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले होते. मिहीर दास यांना त्यांच्या ‘लक्ष्मी प्रतिमा’ सिनेमासाठी राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता. यासोबतच ‘फेरिया मो सुना भौनी के भी भी’ त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता. ‘मू ताते लव करुचि’ या सिनेमासाठी त्यांना बेस्ट कॉमेडियन तर ‘प्रेमा रा अधे अक्षरा’ सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
मिहीर दास यांनी चित्रपट कलाकार संगीत दास यांच्याशी लग्न केले होते. त्यांना अमलान दास नावाचा मुलगा असून तोही एक उत्तम अभिनेता आहे.
हेही वाचा-










