Tuesday, March 19, 2024

आतल्या गोटातील खबर! अभिनेत्री अंकिता लोखंडेचा नवरा आहे ‘घरजावई’?, जाणून घ्या अधिक

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा विवाह १४ डिसेंबर २०२१ रोजी झाला. तेव्हापासून हे कपल सतत चर्चेत आहे. अंकिता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पती विकी जैनसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. विक्की जैन हा बिलासपूरचा आहे पण तो मुंबईत व्यवसाय करतो आणि अंकिताचे कामही इथेच आहे, त्यामुळे हे जोडपे मुंबईतच राहतात, तरीही दोघेही त्यांच्या नवीन घरात जाण्याची वाट पाहत आहेत. अलीकडेच विकी जैनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तो दोन वर्षांपासून अंकिताच्या घरी घरजावई म्हणून राहत आहे. या दोघांनी मुलाखतीत त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.

एका मुलाखतीत, अंकिता आणि विकी जैन यांनी नवीन घरात शिफ्ट होऊ न शकण्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले. यादरम्यान विक्की जैनला जेव्हा विचारण्यात आले की, पत्नीसोबत आपली जागा शेअर करताना आपल्याला कसे वाटते, तेव्हा त्याने गमतीने सांगितले की, “हा प्रश्न अंकिताला विचारला पाहिजे कारण ती सध्या अंकिताच्या घरी घरजावई म्हणून राहत आहे. मी जेव्हाही मुंबईत येतो तेव्हा अंकिताच्या घरी राहतो . तर हा प्रश्न तिला विचारला पाहिजे कारण दोन वर्षांपासून ती तिच्या घरी तिचा वॉर्डरोब माझ्यासोबत शेअर करत आहे.

याविषयी बोलताना अंकिताने असेही सांगितले की, “माझ्यासाठी एक जोडपे म्हणून माझे खरे आयुष्य आहे, आम्ही दोघेही लग्नाआधीच एका छताखाली पती-पत्नीसारखे राहत आहोत. जेव्हा आम्ही आमचे नवीन घर घेऊ तेव्हा आम्ही जोडपे म्हणून एक नवीन सुरुवात करू. विकी जैनने सांगितले की, ‘आम्ही दोघांनी मिळून नवीन फ्लॅट घेतला होता, पण अजूनही त्याचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसारख्या अनेक गोष्टी बाकी आहेत ज्या वेळेवर पूर्ण होऊ शकल्या नाहीत. कोरोना व्हायरसमुळे कामाला खूप उशीर झाला होता, अजून खूप काम बाकी आहे, त्यामुळे आम्हाला नवीन घरात शिफ्ट करता आले नाही.”

पुढे बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली, “मी एक चांगली गृहिणी होईन आणि सर्व काही व्यवस्थित हाताळू शकेन. मला माझे आयुष्य आणि सर्व काही विकीसोबत शेअर करण्यात कोणतीही अडचण नाही.”

अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अंकिता लोखंडे टपवित्र रिश्ता सीझन २ट च्या सीझनमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मानवचे पात्र शाहीर शेख सीझन 2 मध्ये अंकितासोबत मानवची भूमिका साकारत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा