अनेक नवीन मराठी चित्रपट येत आहेत. अशातच व्हिक्टोरिया हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग (pushkar jog) स्कॉटलंडमध्ये त्यांच्या तिसऱ्या मराठी चित्रपट ‘व्हिक्टोरिया’ साठी पुन्हा एकत्र ! ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत .
पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका असलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये झालेले आहे. हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे .जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.
तसेच अभिनेता पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णी सह हा तिसरा चित्रपट आहे , या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, वैशल शाह हे सह निर्माता आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“ज्या जनतेनं त्यांना स्टार बनवलं, तीच त्यांना…”; बॉलिवूडवर प्रकाश झा पुन्हा बरसला
अनुपम खेर यांनी चौपाटीवर महिला सफाई कामगारासोबत केला डान्स, व्हिडिओ जोरदार व्हायरल
अभिनेत्री बनण्यासाठी घरातून गेल्या होत्या पळून, ‘असा’ आहे उषा नाडकर्णी यांचा जीवन प्रवास