Friday, March 31, 2023

‘तु आमच्यात कायम असशील…’ लग्नाच्या धामधुमीत असतानाच सोनाली कुलकर्णीवर कोसळला दुखःचा डोंगर

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी( Sonali kulkarni) सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनालीचे लग्नसमारंभातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेत्रीवर दुखःचा डोंगर कोसळला असून तिच्या कुटूंबातील सदस्याचे दुखःद निधन झाले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सोनालीने एक भावूक पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही बातमी सांगितली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची आजी सुशिला कुलकर्णी यांचे दुखःद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. रविवार दिनांक (२१, ऑगस्ट) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून या बातमीने सोनालीच्या कुटूंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. सोनालीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन सोनालीने आजीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सोनाली आपल्या आजीसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याचबरोबर आजीसोबतचा एक गोड फोटोही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनीही भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओसोबत सोनाली कुलकर्णीने “आजी तु आमच्यासोबत असशील, आम्ही असेपर्यंत” असा भावूक कॅप्शन दिला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या लग्नसोहळ्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत कोरोनाकाळात विवाह केला होता. त्यानंतर तिने पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त लंडनमध्ये विवाह केला. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. सोनालीचा तमाशा लाईव्ह चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता.

हेही वाचा – पहिल्याच चित्रपटाने विमीला मिळालेली ओळख, परंतु पतीमुळे झालेला करिअरचा सत्यानाश
गोपी बहूच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवोलिनाने घेतलंय फॅशन डिझायनिंगचे शिक्षण, ‘अशी’ झाली करिअरला सुरुवात
‘ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय’, प्रथमेश परबबाबत ‘हे’ काय बोलून गेला दिग्गज अभिनेता

 

हे देखील वाचा