×

‘ओ अंटा वा मावा…’ आधी गाण्याने वेड लावले, आता गाणं बनवतानाचा ‘तिचा’ व्हिडिओ पाहून लागेल वेड

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अभिनित ‘पुष्पा‘ चित्रपट चांगलाच धमाल करत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ वाढतच चाललेली दिसून येत आहे. या चित्रपटातील गाण्यांची क्रेझ लहानांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांमध्येच पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार आणि युजर्स या चित्रपटातील गाण्यांवर व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. या चित्रपटातील अभिनेत्री समंथा प्रभूने केलेले आयटम साँग ‘ओ अंटा वा मावा’ या गाण्यासाठी तर चाहते जणू वेडेच झाले आहेत. नुकतेच हे गाणे आता अभिनेत्री सोफी चौधरीने गायले आहे. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोफीने (Sophie Choudry) ‘ओ अंटा वा मावा’ हे गाणे गायले आहे. सोफी हे गाणे गात असताना तिच्याच धुंदीत दिसत असून, ती डान्स करत गाणे म्हणत आहे. हे गाणे गात असताना ती पुरेपुर आनंद लुटताना दिसत आहे. अभिनेत्री या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ फिल्मफेअर या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री सोफी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. तिच्या बोल्ड फोटोंशिवाय ती फिटनेस फ्रीक असल्यामुळे देखील चर्चेत असते. चाहत्यांना तिच्या फिटनेसचे वेड लागले आहे. व्यायाम करतानाही ती व्हिडिओ फोटो शेअर करत असते. सोफीने हिंदी तसेच दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘शादी नं. १’, ‘किडनॅप’, ‘आगर’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.

समंथाने पहिल्यांदा केला आयटम नंबर
याशिवाय ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने ‘ओ अंटा वा मावा’ या गाण्यावर जबरदस्त परफॉर्म केला आहे. या गाण्यातील अभिनेत्रीच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. हे या चित्रपटातील हिट गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याच्या माध्यमातून समंथा पहिल्यांदाच आयटम नंबर करताना दिसली. त्यासाठी तिने मोठी रक्कमही घेतली होती. आता तिच्याबद्दल असे बोलले जात आहे की, ती विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ या चित्रपटात आयटम नंबर करणार आहे.

हेही वाचा-

Latest Post