Tuesday, May 28, 2024

‘स्वर्ग असाच असतो’, सिद्धार्थ चांदेकरची ‘ती’ पोस्ट आली सोशल मीडियावर चर्चेत, एकदा वाचाच

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांना ओळखले जाते. ते दोघे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते दोघे प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करतात. ते चाहत्यांशी नेहमीच कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असातात.

सिद्धार्थ (Siddharth Chandekar) आणि मितालीने (Mitali Mayekar) खूप कमी वेळात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते दोघे सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या फोटोवर चाहचे लाइक आणि कमेंटचा वर्षाव करतात. तर काही नेटकरी त्याच्यावर टिका करतात. मात्र, त्या टिकेकडे दोघेही दुर्लक्ष करतात. या दरम्यान सध्या मितालीने केलेली कमेंंट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या मिताली मुंबईत राहत आहे. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर कामानिमित्त लंडनला गेला आहे. तो तिथून सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. त्याच्या पोस्टवर चाहते भरभरुन लाइक आणि कमेंट करत आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने एका अतिशय रम्य अशा वातावरणातील नदीचा व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्ट करताना सिद्धार्थने लिहिले की, “मला आशा आहे की स्वर्ग असाच असतो…अन्यथा मी इथेच राहीन.”

 सिद्धार्थच्या या पोस्टवर मितालीने कमेंट करत लिहिले की, “तुझे घर हे स्वर्गासारखे आहे आणि तुझी बायको खूप सुंदर आहे. तु आता घरी परत ये…” त्या कमेंटला रिप्लाय देताना सिद्धार्थने विमानाचे इमोजी शेअर केले आहेत. त्यामुळे तो लवकरच घरी परत येणार असल्याचे दिसत आहे. मितालीच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Actor Siddharth Chandekar’s wife Mithali Mayekar misses)

अधिक वाचा- 
करिअरच्या सुरुवातीला विद्याला मुंबईतील 5 स्टार हॉटेलसमोर मागावी लागली हाेती भीक, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा 
‘टिकू वेड्स शेरू’च्या सक्सेस पार्टीत कंगनाने अवनीतसोबत लावले जाेरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा