Saturday, July 27, 2024

संगीतसृष्टीवर शोककळा: संगीतजगतातील ‘या’ लोकप्रिय गायकाचे दुःखद निधन

दक्षिण भारतीय संगीत विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. तेलंगणातील प्रसिद्ध लोकगायक आणि गीतकार गदर यांचे रविवारी (6 ऑगस्ट) निधन झाले. गदर यांचा मृत्यूच ते आजारी असल्यामुळे झाले आहे. काही काळापासून त्यांची तब्येत खराब असल्याचे सांगितले जात आहे. प्रसिद्ध गायकाने वयाच्या 77 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 1980 च्या दशकात तेलंगणा राज्याच्या चळवळीदरम्यान आणि नंतर त्यांच्या क्रांतिकारी गाण्यांसाठी ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

वृद्धापकाळामुळे फुफ्फुस आणि लघवीच्या त्रासामुळे गदर (singer Gadar) यांना हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराच्या गंभीर आजाराने ग्रासले असून त्यांना 20 जुलै रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डाॅक्टरांच्या म्हणाण्यानुसार, 3 ऑगस्ट रोजी त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि ते बरे झाला होता. पण, त्यांना फुफ्फुस आणि लघवीच्या समस्या देखील होत्या, ज्या वयानुसार वाढत गेल्या आणि त्यांच्या निधनाचे निधन झाले.

प्रसिद्ध गायक गदर यांच्या निधनाने सर्वांनाच अस्वस्थ करून सोडले आहे. त्यांच्या निधनावर मोठ मोठे राजकारणीही शोक व्यक्त करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गदर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, तेलंगणातील प्रख्यात कवी, गीतकार आणि कार्यकर्ते श्री गुम्मडी विठ्ठल राव यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. तेलंगणातील लोकांबद्दलचे त्यांचे प्रेम त्यांना उपेक्षितांसाठी अथक लढण्यासाठी प्रेरित करते. तसेच, गदर यांचा वारसा आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील.

गायक होण्यापूर्वी, गदर हा नक्षलवादी होता. ज्याने जंगलासह भूमिगत जीवन जगले. 2018 मध्ये, गदर यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत मतदान केले. टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर अनेक नेत्यांनीही गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. (Famous folk singer and lyricist Gadar from Telangana passed away on Sunday)

अधिक वाचा- 
‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिल्यानंंतर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया; म्हणला, ‘माझी आई आणि मावशी…’
‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितच्या स्थळाला नाही म्हणाले होते सुरेश वाडकर, कारण वाचून व्हाल थक्क

हे देखील वाचा