Friday, December 1, 2023

लग्नाच्या 7 वर्षांनंतर गरोदर झालेल्या विदिशाने शेअर केले फोटो, पोज देत दाखवले बेबी बंप

आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव असतो‌. आई होताना प्रत्येक स्त्रीचा दुसऱ्यांदा जन्म होतो, असेही म्हटले जाते. यावर्षी चित्रपट सृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींना मातृत्व लाभलं आहे. ज्याच्या बातम्या आपण अनेकदा व्हायरल होताना बघितल्या आहेत. पण आता या अभिनेत्रींच्या यादीत ‘भाभीजी घर पर हैं‘ या टीव्ही मालिकेतील अनिता भाभीने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.

विदिशा श्रीवास्तवने (Vidisha) या व्यक्तिरेखतून घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. विदिशाचा सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत. विदिशा घरात चिमुकल्या पावलांचे आगमन होणार आहे. विदिशा लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्याचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने तिच्या बेबी बम्पच्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. तिने शेअर केल्या पोस्टला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहे.

पोस्ट पाहून सर्वजण विदिशाचे अभिनंदन करत आहेत. गरोदरपणाचा ती प्रचंड आनंद घेताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये, विदिशा तिच्या बेबी बंपला बोल्ड रेड आउटफिटमध्ये फ्लॉंट करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोबद्दल बोलायचे तर, त्यात तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या जोडीदारासोबत आनंदाने हसताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 शेवटच्या फोटोबद्दल सांगायचे तर, या फोटोमध्ये विदिश देखील बेबी बंप दाखवत आहे. विदिशाचे हे फोटोशूट आत्तापर्यंतचे सर्वात हॉट बेबी बंप फोटोशूट मानले जात आहे. चाहते तिच्या फोटोंवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. तसेच तिला शुभेच्छा देत आहेत. विदिशाने 2016 मध्ये सायक पॉलशी लग्न केले होते. आता लग्नाच्या 7 वर्षानंतर ती तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. (Vidisha, who got pregnant after 7 years of marriage, shared photos of her baby bump)

हेही वाचा-
विघ्नेशने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पाेस्ट; काय म्हणाला अभिनेता? लगेच वाचा
रितेश देशमुखचा ‘तो’ व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले, “एका वाघाची शिकार..”

हे देखील वाचा