अनिता राज यांनी बॉलीवूडमध्ये मिथुन आणि धर्मेंद्रसारख्या सुपरस्टारसोबत काम केले आहे. याशिवाय ती टेलिव्हिजन शो छोटी सरदारनी आणि अनिल कपूरच्या शो 24 मध्ये नैना सिंघानियाच्या भूमिकेत दिसली आहे. चला तर या अभिनेत्रीच्या वाढदिवशी, तिचे आयुष्य थोडे अधिक जवळून जाणून घेऊया………
अनिता राज (Anita Raj) यांनी ऐंशी-नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले. अभिनेत्रीचा जन्म 13 ऑगस्ट 1962 रोजी मुंबईत झाला. ती आज 60 वर्षांची झाली आहे. त्या काऴात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होत असे. नोकर बिवी का, असली नकली असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यांनी माया या दूरदर्शनवरील मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. या मालिकेत त्यांनी माया ही मुख्य भूमिका साकरली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंदी मिऴली होती. परंतु या मालिकेनंतर त्यानी छोट्या पडद्यापासून दूर राहाणेच पसंत केले होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, अनिता राजच्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा ती जवळपास 21 वर्षे रुपेरी पडद्यापासून गायब होती. तिने 1986 मध्ये चित्रपट दिग्दर्शक सुनील हिंगोरानी यांच्याशी लग्न केले.
अनिता राजने हिंगोरानीशी लग्न केले
अनिता राजने 1981 मध्ये आलेल्या ‘लव्ह सॉन्ग’ चित्रपटात काम केले आणि सुनील हिंगोरानी दिग्दर्शित डेब्यू ‘करिश्मा कुदरत’ का मध्ये काम केले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील आणि अनिता यांच्यात जवळीक वाढली. यानंतर या दोघांमध्ये अफेअर सुरु झाले.
जेव्हा अनिता राज पडद्यावर परतली
अनिता आणि सुनील यांचा विवाह 1986 मध्ये झाला. लग्नानंतर अनिताने ‘लैला’ ‘जान की बाजी’, ‘मेरा हक’, ‘प्यार किया है प्यार करेंगे’, ‘क्लर्क’, ‘नफरत की आंख’, ‘विद्रोही’, ‘अधर्म’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यानंतर ती इंडस्ट्रीपासून दुरावले. अनिताने 2012 मध्ये पुनरागमन केले आणि चार दिन की चांदनी या चित्रपटात दिसली, परंतु यश न मिळाल्याने तिने टेलिव्हिजन शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
अनिताने 24, तुम्हारी पाखी, एक था राजा एक थी रानी, छोटी सरदारनी मध्ये काम केले. टेलिव्हिजन शोमध्ये त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, एक काळ असा होता जेव्हा धर्मेंद्र अनिता राजच्या प्रेमात पडले होते, परंतु दोघांची प्रेमकहाणी पुढे जाण्याआधीच धर्मेंद्रच्या घरच्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि धर्मेंद्रने अनितापासून दुरावले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
नकारात्मक पात्रांनी दिली खरी ओळख, वैयक्तिक आयुष्यामुळे काम्या पंजाबी नेहमीच बनली चर्चेचा विषय
काय सांगता! ‘जुदाई’ चित्रपटावेळी श्रीदेवी होत्या प्रेग्नेंट, सहअभिनेत्रीनेच केला खुलासा
जेव्हा मिथुनदा आणि श्रीदेवीच्या किसींग सीनमुळे झालेला मोठा राडा, अभिनेत्रीने थेट पत्रकारांपुढेच…