Thursday, July 18, 2024

बापरे! विद्या बालनने शेअर केला बाथरुममधील व्हिडिओ, नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच सर्वात जास्त चर्चेत येत असतात. यामध्ये अभिनेत्री विद्या बालनचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. विद्या बालन (Vidya Balan) सध्या सिनेसृष्टीत फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्यावर तिच्या चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत असतात. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगलेली दिसत आहे. 

विद्या बालन ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. यावरुन विद्या अनेक मजेशीर व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

विद्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ती बाथटबमध्ये बसून अनुपमाच्या आपको या व्हायरल डायलॉगवर रिल बनवताना दिसत आहे. विद्याच्या या मजेशीर रिलने, आणि तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. व्हिडिओमध्ये विद्या विनोदी अभिनय करताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांच्याही जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

 

दरम्यान, विद्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘नियत’ या चित्रपटात झळकणार आहे. याआधी विद्याचे ‘डर्टी पिक्चर’, ‘कहाणी’ हे चित्रपट चांगलेच गाजले होते. या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.

हेही वाचा- ‘तु स्वप्नं पाहत जा…’ सई ताम्हणकरच्या बॉयफ्रेंडची सईसाठी खास पोस्ट, चाहत्यांनीही केले कौतुक
दु:खद! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी घेतला जगाचा निरोपका फिरलेतं आमिर खानचे ग्रह? बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने पाच वर्षात मागितली तीन वेळा माफी

हे देखील वाचा