मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतीच सईला मिमी चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोकृष्ठ सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यामुळेच तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सईच्या चाहत्यांसह अनेक मराठी तसेच बॉलिवूड कलाकारांनीही याबद्दल सईचे कौतुक केले आहे. यामध्येच अभिनेत्री सईच्या बॉयफ्रेंडची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने सईचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सई ताम्हणकर ही मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तसेच बोल्ड लूकने ती सिनेसृष्टीत चांगलीच प्रसिद्ध आहे. नुकताच सईला सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यामुळेच सईचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सईच्या चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनीही तिला सोशल मीडियावरुन याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या सईचा बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये अनिशने सईचे कौतुक करताना “तिने या यशासाठी जिवतोड मेहनत घेतली आहे. तिने दिर्घकाळ या यशाचे स्वप्न पाहिले आहे, ती सर्वोत्तम आहे आणि कायम असणार असे म्हणले आहे. या पोस्टमध्ये अनिशने तिला तिच्या मेहनतीने हे फळ मिळाले आहे, म्हणत तु स्वप्ने पाहात जा”, असा सल्लाही सईला दिला आहे. या पोस्टसोबतच अनिशने ट्रॉफीसोबतचा सईचा फोटोही शेअर केला आहे.
अनिशच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तसेच तिच्या चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा – का फिरलेतं आमिर खानचे ग्रह? बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने पाच वर्षात मागितली तीन वेळा माफी
लग्नानंतर दोन वर्षातच कोर्टात पोहोचली लवस्टोरी, लोकप्रिय अभिनेत्रीची पतीविरोधात तक्रार दाखल
व्हायरल फोटोमुळे शेफाली वैद्य यांची सई ताम्हणकरवर जोरदार टिका; म्हणाल्या, ‘कोणती हिंदू स्त्री…’