Thursday, March 28, 2024

कशी नशिबाने थट्टा आज मांडली! विद्युत जामवालच्या अभिनेत्रीला रस्त्यावर विकावी लागतेय भाजी

कलाकार हे नेहमीच आपल्या डोळ्यापुढे असतात. मात्र, काही वेळा ते असे रूप धारण करतात की, त्यांना कितीही निरखून पाहिले, तरीही ओळखणे कठीण होऊन बसते. आताही असेच काहीसे झाले आहे. सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून कोणाच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. हा एका अभिनेत्रीचा फोटो असून सर्वांचे लक्ष वेधत आहे. तिची स्थिती अशी झालीये की, तिला पाहून कुणालाही पटकन ओळखता येणार नाही. हा पोटो पाहून चाहत्यांचीही भंबेरी उडाली आहे. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण. चला तर जाणून घेऊया…

अदा शर्माच्या फोटोचा सोशल मीडियावर राडा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत एक महिला भाजी घेऊन बसलेली दिसत आहे. या महिलेला ओळखताना चाहत्यांना घाम फुटत आहे. खरं तर, ही महिला इतर कुणी नसून बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ही आहे. अदाला पाहून ती महिला तीच आहे, हे ओळखणे चाहत्यांना कठीण होत आहे. खराब स्थितीत दिसणाऱ्या अदाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये “असं ऐकलंय भाजीचा भाव वाढला आहे.” तिच्या या पोस्टला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 1 हजारांहून अधिक चाहत्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

कास्टिंग काऊचवर काय म्हणाली?
अदा शर्मा नेहमीच मोकळेपणाने आपले विचार मांडताना दिसते. एकदा तिने कास्टिंग काऊचबद्दल चर्चा केली होती. ती म्हणाली होती की, “कास्टिंग काऊच ही अशी गोष्ट नाहीये, जी दक्षिण किंवा उत्तरमध्ये उपस्थित आहे. मला वाटते की, ही एक अशी गोष्ट आहे, ज्याबद्दल जगभरात चर्चा केली जाते. हे सर्वत्र आहे.” ती पुढे म्हणते की, “तुमच्याकडे नेहमी पर्याय असतो. तुम्हाला एकतर हे स्वीकारायचे आहे किंवा त्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. तुम्हाला करावेसे नाही वाटले, तर तुम्ही करूही नाही शकत.”

अदाची कारकीर्द
बॉलिवूडव्यतिरिक्त तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमातही काम केले आहे. तिने सन 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ या हॉरर सिनेमातून पदार्पण केले होते. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुक केले होते. यानंतर ती ‘हम हैं राही कार के’, ‘हंसी तो फंसी’ आणि ‘कमांडो २’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अभिनयाला घाणेरडा व्यवसाय मानायचे अशोक कुमार, तर हिरो बनल्यामुळे तुटलं होतं अभिनेत्याचं लग्न
कंगना राणौतने शेअर केला लहानपणीचा फोटो, आईची साडी नेसून नाचताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा