आपल्या ऍक्शनमुळे बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण करणाऱ्या विद्युत जामवालचा (Vidyut Jamwal) मार्शल आर्ट्सचा ट्रेंड आहे आणि तो अनेकदा आपल्या चित्रपटांमध्ये दमदार स्टंट करताना दिसतो. विद्युत त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रसिद्धीच्या झोतात राहतो. नंदिता महतानीसोबत तो नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. गेल्या वर्षी दोघांनी रोमँटिक पद्धतीने साखरपुडा केला होता. आता दोघेही अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. अलीकडे, दोघेही एका डिनर डेटवर एकत्र दिसले होते. जिथे त्यांचे पोशाख पाहून सोशल मीडिया युजर्सने त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
विद्युत जामवाल आणि नंदिता महतानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. पण युजर्सच्या नजरा त्याच्या बॉटमवेअरवर खिळल्या होत्या. मग युजर्सने त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.
विद्युत आणि नंदिता गेले डेटवर
खरं तर, प्रसिद्ध पॅपराझी व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विद्युत आणि नंदिता एकत्र डिनर डेटवर दिसत आहेत. विद्युतने त्याच्या डिनर डेटसाठी ब्लॅक अँड व्हाइट आउटफिट निवडले. त्याने पांढऱ्या शर्टवर काळी हुडी आणि सैल पलाझो स्टाइल पॅन्ट परिधान केली होती. पण हे काहीसे वेगळेच होते.
नंदिता महतानीने केले आहेत कपडे डिझाइन
त्याचा लूक बघून एक पॅपराझी “काय लूक आहे सर” म्हणाला. पॅपराझीच्या या कौतुकाला अभिनेत्याने उत्तर दिले आणि म्हणाला की, “हा ड्रेस आहे, हे मार्शल आर्ट्स वॉरिअर मास्टरचे कपडे आहेत.” दुसऱ्या पॅपराझीच्या प्रश्नावर त्याने सांगितले की, हा पोशाख त्याची जोडीदार नंदिता महतानीने डिझाइन केला होता.
सोशल मीडियावर केले ट्रोल
विद्युतचा हा विचित्र आउटफिट पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स त्याची खूप खिल्ली उडवत आहेत. एका युजरने लिहिले की, “ही कसली फॅशन आहे.” दुसर्याने लिहिले की, “तुम्ही प्लाझो का घातले आहेत.” आणखी एकाने लिहिले की, “तिने हॅलोविनचा पोशाख घातला आहे.” एकाने तर त्याच्या फॅशन सेन्सला फॅशन डीजास्टर म्हटले.
‘इंडियाज अल्टिमेट वॉरियर’ हा रियॅलिटी शो आहे, ज्यामध्ये विद्युत जामवाल लीड करत आहे. या शोमध्ये स्पर्धक त्यांच्या मार्शल आर्टचे कौशल्य दाखवताना दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :