Monday, March 4, 2024

अखेर रश्मीकासोबत लग्नाच्या बातम्यांवर विजय देवरकोंडाने सोडले मौन, मीडियासमोर केले मोठे वक्तव्य

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay devrkonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोन स्टार्स काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांचेही एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडे अशीही अफवा पसरली होती की विजय आणि रश्मिका लवकरच एंगेजमेंट करणार आहेत. आता या अफवांना विजय देवरकोंडा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एका मुलाखतीत विजयने अभिनेत्री रश्मिकासोबत डेटिंग आणि एंगेजमेंटच्या चर्चेला पूर्णपणे नकार दिला. या अभिनेत्याने सांगितले की, तो फेब्रुवारीमध्ये साखरपुडा करणार नाही किंवा लग्नही करणार नाही. विजय पुढे म्हणाला, “मला असे वाटते की प्रेस (मीडिया) मला दर दोन वर्षांनी लग्न करायचे आहे. ही अफवा मी दरवर्षी ऐकतो. प्रेस फक्त माझ्या लग्नाची वाट पाहत आहे.”

विजयने केलेल्या या खुलाशामुळे रश्मिकासोबतच्या त्याच्या एंगेजमेंटच्या अफवांना पूर्णविराम मिळाला, पण त्या दोघांच्या इंस्टाग्राम पोस्ट पाहता, त्यांच्या डेटिंगच्या अफवा अजूनही चर्चेत आहेत. नुकतेच दोन्ही स्टार्स परदेशात एकत्र सुट्टी घालवल्याची बातमीही समोर आली होती.

विजयच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट आहेत. विजय अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत ‘फॅमिली स्टार’मध्ये दिसणार आहे. ‘फॅमिली स्टार’ हा विजयचा मागील सुपरहिट चित्रपट ‘गीता गोविंदम’ प्रमाणे कौटुंबिक मनोरंजन करणारा असेल.

‘फॅमिली स्टार’ हे गीता गोविंदम दिग्दर्शक परशुराम पेटला यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट सुरुवातीला संक्रांतीला प्रदर्शित होणार होता, परंतु या काळात अनेक चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तो पुढे ढकलण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

एकेकाळी डिप्रेशनशी झुंजत होती भाग्यश्री; म्हणाली, ‘त्या कठीण काळात मुले आणि पतीही माझ्यासोबत नव्हते’
सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता; गदर 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा