Thursday, September 28, 2023

भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या 4 सुपरस्टार्सच्या सिनेमांमध्ये आघाडीवर कोण? ‘हा’ सिनेमा सपशेल फ्लॉप

सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर 4 सिनेमांची चांगलीच चर्चा रंगली आहे. चाहते या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत होते. यापैकी दोन सिनेमांनी फक्त भारतातच नाही, तर जगभरातील बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहेत. यामध्ये रजनीकांत यांचा ‘जेलर‘, तर सनी देओल याचा ‘गदर 2‘ सिनेमा परदेशातही छप्परफाड कमाई करत आहेत. दुसरीकडे, अक्षय कुमार याचा ‘ओएमजी 2’ या सिनेमाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमा चांगली कमाईदेखील करत आहे. मात्र, ‘गदर 2’सारखी छाप सोडण्यात ‘ओएमजी 2’ मागे पडला. याव्यतिरिक्त चिरंजीवी यांचा ‘भोला शंकर’ हादेखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे.

‘भोला शंकर’ (Bhola Shankar) सिनेमा 15 ऑगस्ट रोजी 1 कोटींचीही कमाई करू शकला नाही. या चार सुपरस्टार्स आणि मोठ्या बजेटच्या सिनेमात रजनीकांत (Rajinikanth) यांच्या ‘जेलर’ (Jailer) सिनेमाचा दबदबा कायम आहे. हा सिनेमा 10 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 48.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच, दुसऱ्या दिवशी सिनेमाने 25 कोटी रुपये छापले होते.

‘जेलर’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘जेलर’ने तिसऱ्या दिवशी 34 कोटी, चौथ्या दिवशी 42 कोटी आणि पाचव्या दिवशी 28 कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सिनेमाने सहाव्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 33 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या हिशोबाने रजनीकांत यांच्या सिनेमाने 6 दिवसात 216 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच, जगभरात सिनेमाने 400 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘गदर 2’ आणि ‘ओएमजी 2’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘जेलर’ सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या ‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमाच्या कमाईवर परिणाम केला आहे. तरीही, सनीच्या सिनेमाने 5 दिवसात 228.98 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, अक्षयच्या सिनेमाने 5 दिवसात 72.27 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याव्यतिरिक्त चिरंजीवी (Chiranjeevi) यांचा ‘भोला शंकर’ सिनेमा सर्वात मागे आहे. या सिनेमाने 15 ऑगस्ट रोजी फक्त 75 लाख रुपयांची कमाई केली. सिनेमाने ओपनिंग डेला 16.25 कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाची एकूण कमाई 27 कोटी रुपये झाली आहे. हा सिनेमा पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. (Rajinikanth film jailer box office collection day 6 know the collection on independence day)

महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण; बेल्ट आणि बांबूच्या काठीने चोप दिल्यानंतर…
राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या घरातून आलीये मनीषा कोईराला, कर्करोगाने लावला करिअरला ब्रेक

हे देखील वाचा