×

‘लेट्स मेक ए लव स्टोरी, विजय देवरकोंडा ने प्रॅन्क करत समंथाला दिले वाढदिवसाचे खास सरप्राईज

नुकताच दाक्षिणात्य अभिनेत्री असलेल्या समंथाने तिचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. समंथा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील कामात व्यस्त होती. संपूर्ण जगातून तिला विविध माध्यमातून खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला तिच्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा मिळाल्या. मात्र यासर्वांमधे समंथाला एक खास सरप्राईज गिफ्ट मिळाले ज्याची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा रंगली आहे. सध्या समंथा विजय देवरकोंडासोबत काश्मीरमध्ये तिच्या गामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच सेटवर तिला एक मस्तीने भरपूर असे वाढदिवसाचे सरप्राईज देण्यात आले. या सरप्राईजनंतर तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

या सरप्राईजचा एक व्हिडिओ विजयने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये समंथा अतिशय मनापासून तिच्या सीनचा सराव करताना दिसत आहे. यादरम्यान तिला तिचे दिग्दर्शक देखील सीनबद्दल काहीतरी समजावताना दिसत आहे. यातच तिचा सराव पूर्ण होतो आणि फायनल टेकसाठी शूटिंग सुरु होते. समंथा तिला दिलेले सर्व संवाद बोलताना दिसते. सीन सुरु असतो ती अगदी मनापासून संवाद बोलते मधेच विजय तिला म्हणतो, “हॅप्पी बर्थडे समंथा” आणि त्यानंतर सेटवरील सर्वच लोकं तिला शुभेच्छा देऊ लागतात. एक मोठा केक आणला जातो आणि समंथाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा होताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

समंथाला वाढदिवसाचे सरप्राईज देण्यासाठी खोटा सीन लिहिला गेला आणि सेटवर संपूर्ण वातावरण असे टायर केले गेले जसे काही खरंच शूटिंग होत आहे. हे सरप्राईज पाहून समंथा देखील खूपच खुश झाली. सध्या विजयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post