सध्या सोशल मीडियावर 2016 ट्रेंड जोरात चर्चेत आहे. सामान्य लोकांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण दशकभर जुन्या आठवणी शेअर करत आहेत. जान्हवी कपूर, आलिया भट्ट, कियारा अडवाणी यांच्यानंतर आता अभिनेता विजय वर्माही या ट्रेंडमध्ये सहभागी झाला आहे. मात्र, विजयने शेअर केलेल्या एका फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
विजय वर्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका सुपरस्टारच्या घरातील बाथरूम दिसत असून, त्यातील गोल्डन टॉयलेट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विजयने कॅप्शनमध्ये स्पष्ट केले की ही सेल्फी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरातील आहे. फोटो पाहताच युजर्सकडून भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी बिग बींच्या घरातील टॉयलेटला अल्ट्रा-लक्झरी म्हटले, तर काहींनी “हे खरंच सोन्याचं आहे का?” असा सवाल उपस्थित केला.
‘2026 इज द न्यू 2016’ या ट्रेंडअंतर्गत विजय वर्माने 2016 मधील काही खास क्षणांची फोटो सीरिज शेअर केली आहे. त्याने 2016 हे आपल्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरल्याचे सांगितले. कॅप्शनमध्ये विजयने लिहिले, “2016 माझ्यासाठी माइलस्टोन ठरला. अमिताभ बच्चन आणि शूजित दा यांच्यासोबत ‘पिंक’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची भेट झाली. अमिताभ बच्चन यांच्या घरात गोल्डन टॉयलेटसोबत सेल्फी घेतली. संजय मल्होत्रा आणि फातिमा सना शेख हे जिम बडीज झाले. माझ्या हिरो इरफान खान यांची भेट झाली.”
या सीरिजमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेली फोटो म्हणजे गोल्डन टॉयलेटसोबतची सेल्फी. एका युजरने “वा! गोल्डन टॉयलेट” अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने “पहिल्यांदाच लक्झरी टॉयलेट पाहून विजयने सेल्फी घेतली” असे म्हटले. आणखी एका कमेंटमध्ये, “गोल्डन टॉयलेटने सगळी लाइमलाइट लुटली” असे लिहिले आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, विजय वर्मा (Vijay Varma)अलीकडेच ‘गुस्ताख इश्क’मुळे चर्चेत होता, ज्यात तो फातिमा सना शेख आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत दिसला. लवकरच तो वेब सीरिज ‘मटका किंग’मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
“तस्करी” च्या दिग्दर्शकाने सांगितला विमानतळावर शूटिंग करतानाचा त्यांचा अनुभव


