Thursday, November 21, 2024
Home मराठी ‘तुमच्याशिवाय जगणे कठीण आहे…’; विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलिया आणि रितेश भावूक

‘तुमच्याशिवाय जगणे कठीण आहे…’; विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलिया आणि रितेश भावूक

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध आणि नावाजलेल्या जोडप्यांपैकी एक जोडपे म्हणजे, रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख होय. रितेश सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. रितेश आणि जिनिलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. जी सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

रितेशचे (Riteish Deshmukh) वडिल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच्या आठवणीत रितेश आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) भावूक झाले आहेत. रितेशने ( Riteish Deshmukh Instagram ) एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्ट शेअर करताना लिहीले की, “पप्पा तुमची खूप आठवण येते.” त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 त्याचवेळी जिनिलियाने (Genelia Deshmukh Instagram) देखील एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्ट करताना लिहीले की, “प्रिय पप्पा, मला तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की, तुमचा विचार करणे खूप चांगले आहे. पण तुमच्याशिवाय जगणे मात्र फार कठीण आहे. मला खात्री आहे की, तुम्ही जिथे असलात ती जागा नक्कीच खूप खास असले. कारण तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणु शकता. ते तुमच्याच कौशल्य आहे. आम्हाला तुमची खूप खूप आठवण येते पप्पा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

कोण आहेत विलासराव देशमुख?
विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील मराठा कुटुंबात झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञान आणि कला या दोन्ही विषयांत पदवी संपादन केली. त्यानंतर पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटी कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. देशमुख यांनी अभ्यासाबरोबरच समाजसेवाही सुरू ठेवली. तशीच त्यांची पावले राजकारणाच्या दिशेने पुढे जात राहिली. 1980 ते 1995 या काळात विलासराव देशमुख सलग तीन निवडणुकांत विधानसभेवर निवडून आले. यानंतर त्यांनी विविध मंत्रालयात मंत्री म्हणून काम केले. 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 पर्यंत पहिल्यांदा मुख्यमंत्री होते. (Vilasrao Deshmukh Shaam Jinlia Deshmukh and Riteish Deshmukh got emotional on social media)

अधिक वाचा- 
भारीच ना! तब्बल 4 वर्षांनंतर पाहायला मिळाला शाहरुखचा रोमँटिक अंदाज, ‘या’ गाण्यात नयनतारासोबत केला रोमान्स
नूतनशी लग्न करायचे शम्मी यांचे स्वप्न राहिले अधुरे, दुसऱ्याच मुलीचा भरावा लागला लिपस्टिकने भांग

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा