Tuesday, June 25, 2024

‘२ इंडियाज’ वादानंतर भारतात परतला कॉमेडियन वीरदास, सोशल मीडियावर ट्रोल

कोण व्यक्ती कोणत्या कारणामुळे अचानक चर्चेत येईल याचा काही नेम नाही. कॉमेडियन वीरदास असाच मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेत आला आहे. प्रत्येक मुद्द्यावर आपले स्पष्ट मत मांडणारा वीरदास कधी कधी त्याच्या व्यक्तव्यामुळे देखील वाढत येतो. वीरदासचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात त्याने भारताबद्दल एक व्यक्तव्य केले होते. याच कारणामुळे मागील काही काळापासून सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहे. अमेरिकेत असणारा वीरदास आता मुंबईमध्ये परत आला आहे.

वीर इंटरनेशनल एमी पुरस्कारांमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेत गेला होता. आता तो पुन्हा भारतात परत आला आहे. नुकतेच त्याला मुंबई एयरपोर्टवर स्पॉट केले गेले. वीर त्याच्या पत्नीसोबत शिवणीसोबत दिसला. वीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरूनही त्याला ट्रोल केले जात आहे.

वीर का एयरपोर्टचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर असणाऱ्या विरल भियानाने त्याचं इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. शिवानीचा हात पकडून वीरदास एयरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत असून, व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. एकाने लिहिले की, “हा कोणत्या भारतात आला आहे?”, अजून एकाने लिहिले, “हा आपल्या देशाला प्रिसेंट नाही करत हा फक्त विदेशातच ठीक आहे.”, एकाने लिहिले, “याच्याविरुद्ध एफआयआर झाली आहे ना मग अटक करा.”

वीरने त्याच्या व्हिडिओ २ इंडियाजमध्ये भारताच्या २ भागांबद्दल व्यक्तव्य केले आहे. त्याने शेतकरी आंदोलनापासून प्रदूषणापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर भाष्य केले. त्याचाच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून वीर विरोधात एफआयआर दाखल केल्या गेल्या. भारतातील काही राज्यांमध्ये तर त्याचे शो बॅन करण्यात आले आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने अजून एक व्हिडिओ शेअर करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने म्हटले की, “जेव्हापर्यंत मी कॉमेडी करू शकतो मी माझ्या देशासाठी प्रेम पत्र लिहीत राहील.”

वीरदासने कॉमेडी शोसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात ‘बदमाश कंपनी’, ‘दिल्ली बेली’, ‘गो गोवा गॉन’, ‘लव्ह आज कल’, ‘मस्तीजादे’, ‘सांता बंता’ आदी अनेक सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा