टेलिव्हिजन विश्वामध्ये अशा अनेक मालिका आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अशीच एक सिरीयल म्हणजे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आहे. तर या सिरीयल बाबत सध्या चर्चा सुरू आहे. कारण निर्माते त्यांच्या कथानकात रोमँटिक ट्विस्ट आणला आणत आहे. या वेळी शोला टीआरपीमध्ये टॉप 5 मध्ये स्थान मिळवता आले नसले तरी, टीमने हार मानलेली नाही. ते नवीन नवीन उपक्रम करत आहेत जेणेकरुन ती आजुन प्रेक्षकांना आवडेल.
तर या सिरीयल मध्ये आता मालिकेच्या आगामी ट्रॅकमध्ये रोमान्सचा एक नवीन स्फोट पाहायला मिळेल. कारण अरमान आणि अभिराच्या नात्याला एक नवीन वळण मिळणार आहे. अनेक आव्हाने आणि गैरसमजांना तोंड दिल्यानंतर, सुपरहिट कपल ‘अभिमान’ला अखेरीस तो दिलासा आणि प्रेममय क्षण मिळतील, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिरा आणि अरमानचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत.
समृद्धी शुक्ला आणि रोहित (rohit)पुरोहित यांच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत प्रेक्षकांना अभिरा आणि अरमानची रोमँटिक केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. एका व्हायरल पोस्टमध्ये, ते दोघे पावसात एकमेकांच्या प्रेमात मग्न असलेले दिसत आहेत. त्यांचे बहरणारे प्रेम त्यांना या उदास वातावरणातही शांत राहण्यास मदत करते. दरम्यान, पोद्दार कुटुंब न सुटलेल्या तणावांना आणि जुन्या संघर्षांना तोंड देताना दिसेल. आगामी भागांमध्ये रोमान्स आणि भावनिक गुंतागुंत यांचा सुंदर समतोल साधला गेला आहे, ज्यात अरमान आणि अभिरा एकमेकांकडे परतण्याचा मार्ग शोधताना दाखवले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
कॉमेडीयन सुनील पालसोबत घडलं भयंकर, सत्कार करण्यासाठी बोलावून स्टेजवरून हाकललं?


