सध्या देशभरातच नाही तर जगभरातही नव्या वर्षाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु आहे. सगळेचजन येणाऱ्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. क्रिसमस आणि नवीन वर्ष हे थेड्या दिवसांच्याच अंतरावर असल्यामुळे अनेकजन सुट्ट्या घेऊन फिरायला जात असतात. अशातच सेलिब्रिटी आपल्या अनोख्या पद्धीते नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हटके अंदाजात शुभेच्छा देत असतात. नुकतंच बॉलिवूडचं लोकप्रिय कपल म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
भारतीय क्रिकेट संघामधील लोकप्रिय क्रिकेट विराट कोहली (Virat Kohali) आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी नुकतं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. सध्या विराट टीम इंडियासोबतच्या बांगलादेश दौऱ्यावर होता, तिथूनच तो त्याच्या घरी मुंबईला गेला होता. यानंतर कोहली नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासठी आपल्या कुटुंबासोबत दुबईच्या यात्रेला निघाला आहे. विमान तळावर जात असताना विराट आणि अनुष्काचा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.
विराटने आपल्या अधिकृत इस्टग्राम अकाउंटवरुन विराट पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका आपल्या लहान कुटुंबाचा दुबईमधील एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो दुबईच्या हॉटेलमध्ये एका तालावजवळ उभे राहिलेले असून सुर्योदयाकडे पाहाताना दिसून येत आहेत. भले त्यांची पाठ कॅमेऱ्याकडे होती मात्र, स्पष्ट दिसून येते की विराटने वामिकाला हातात पकडले असून एके बाजूने अनुष्का थांबली आहे. विराटने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “2022 च्या शेवटच्या सूर्योदयापर्यंत”
View this post on Instagram
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेत्री लग्नानंतर पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे. अनुष्का लवकरच ‘चकडा एक्सप्रेस‘ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. अनुष्काचा हा चित्रपट माजी भारतीय खेळाडू माहिला झुलन गोस्वामी यांच्या जिवनावर प्रेरणा घेऊन बनवला आहे. त्याशिवाय अनुष्का मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुणाच्या चालण्यावर कमेंट, तर कुणाला म्हटले ‘गोल्ड डिगर’, पण कलाकारांनीही ट्रोलर्सला शिकवला चांगलाच धडा
‘ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा…’, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदवर संताप