Saturday, April 20, 2024

झुलन गोस्वामीच्या भुमिकेत झळकणार अनुष्का शर्मा, फस्ट लुक शेअर करुन वाढवली चाहत्यांची उत्सुकता

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ती तिने लग्न झाल्यापासून अभिनय क्षेत्रामध्ये काम करणे बंद केले हेते. मात्र, ती सोशलमीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी आपले आणि बाळाचे फोटो शेअर करत चाहत्यांना भेटत असते. तिने नुकतच आपल्या इंन्सटाग्राम अकाउटवर एक पोस्ट शेअर करततिने चित्रपटात परतल्याची बातमी दिली आहे हे खरच आहे का? जाणुन घेउया पूर्ण माहीती.

अनुष्का शर्मा( Anushka Sharma) पाच वर्षानी क्रिकेटर झूलन गोस्वामी(jhulan goswami) यांच्या जिवनावर आधारित चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पादार्पन करत आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये अनुष्का वेगळ्याच लुक मध्ये दिसत आहे ती भर पावसामध्ये एका पीसीओ फोनवर बोलत छोट्या केसांमध्ये दिसत आहे. या चित्रपटामध्ये अनुष्काचा हटके लुक शॉर्ट केसांमध्ये पहायला मिळनार आहे.

अनुष्काचा हटके लुक पाहुन चाहते झाले उत्सुक

अनुष्काने नुकताच आपला ‘रफ आणि टफ’ लुकचा फोटो शेअर केला आहे, आणि सोबतच एक कॅप्शनही दिले आहे की, “चित्रपटातील हा क्षण सगळ्यांनाच दाखवने फारच गरजेचे होते.” या फोटोमध्ये अनुष्का म्हणजेच ‘झुलन गोस्वामी’ खूपच त्रस्त दिसत आहे तिच्या चेहऱ्यावरुन ती घाबरलेली दिसत आहे. ही पोस्ट पाहुन चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)


चित्रपट करत असताना अनुष्काला न्हवता स्वत:वर विश्वास

अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर तिने पहिल्यांदाच एका मुलाखतीत आपल्या कामाबद्दलचा अनुभव शेअर करत सांगितले आहे की, “मी आताच एका मुलीला जन्म दिला आहे, मी पहिल्यासारखी ताकदवर नाही राहिले मला आधीच आजारी असल्याने माझ्या अंगातली ताकद कमी झाली आहे. मी खूप दिवसापासून व्यायामही केले नाही त्यमुळे माझा विश्वास थोडा डगमगत होता. मात्र माझ्या आतमधल्या आवाजाने मला नेहमी करत जा असेच सांगितले आहे त्यामुळे मी या चित्रपटाचा भाग होऊ शकले.”

अनुष्काने शेवटी कोणत्या चित्रपटात काम केले होते.?

अनुष्का शर्मा या चित्रपटासाठी खूप दिवसापासून जिवतोड मेहनत करत आहे. ती नेहमी आपल्या सोशल मीडियाद्वारे क्रिकेट प्रॅक्टीसचे व्हिडीओ शेअर करत असते. ती या चित्रपटामध्ये झूलन गोस्वामी ची भुमिका साकारणार आहे जी एक भारतीय महिला संघाची पूर्व कॅप्टन होती, तिच्या जिवनावर आधारित हा एक बायोपिक चित्रपट आहे. हा चित्रपट 2 फेब्रुवरी 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या पूर्वी अनुष्काने 2018 मध्ये शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ यांच्या सोबत चित्रपट ‘जिरे’ मध्ये काम केले होते. अनुष्का पुर्ण पाच वर्षानी या हटके अंदाजात परत येणार असल्याने चाहते चित्रट बघण्यासाठी खूपच उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा
इंग्लडच्या राणीच्या निधनाने सिनेजगतही हळहळले, ‘या’ अभिनेत्रींनी पडद्यावर भूमिका साकारुन मिळवली होती प्रसिद्ध
आईच्या आग्रहाने तोरल रासपुत्रा बनली अभिनेत्री, ‘बालिका वधू’ बनून केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य
अक्षय कुमार ते खिलाडी नंबर वन, कोणतीही पार्श्वभूमी नसताना असा केला अक्षयने ३० वर्षांचा फिल्मीस्तानातील प्रवास

हे देखील वाचा