रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. हे दोघेजण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, तर त्यांच्या या लग्नाला त्यांनी एक नाव दिले आहे ते म्हणजे “विरोश”. तर वेडिंगच ठिकाण अगदी शाही पद्धतीचं आहे उदयपूरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हे ठिकाण आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
चाहते अनेकदा या पॉवर कपलच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करतात. विजय (Vijay)आणि रश्मिका यांच्यातील वयाच्या फरकाचा विचार करता, विजय देवरकोंडाचा जन्म 9 मे 1989 रोजी झाला होता, म्हणजे तो 36 वर्षांचा झालाय आणि या वर्षी तो त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करेल. रश्मिका मंदान्ना यांचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी झाला होता, त्यामुळे ती 29 वर्षांची झाली. अशाप्रकारे, विजय हा भावी पत्नी रश्मिकापेक्षा जवळजवळ सात वर्षांनी मोठा आहे.
विजय आणि रश्मिका यांनी 22 फेब्रुवारी रोजी एका अतिशय भावनिक सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी हा खास प्रसंग त्यांच्या चाहत्यांना समर्पित केला आणि त्यांच्या लग्नाचे अधिकृत नाव ‘द वेडिंग ऑफ विरोश’ असे ठेवले असल्याचे जाहीर केले. त्यांच्या संदेशात त्यांनी लिहिले, “आमच्या प्रियजनांनो, आम्ही स्वतःसाठी काहीही निवडण्यापूर्वी तुम्ही तिथे होता. तुम्ही खूप प्रेमाने आम्हाला ‘विरोश’ हे नाव दिले. म्हणून आज, आमच्या संपूर्ण मनाने, आम्ही तुमच्या सन्मानार्थ आमच्या लग्नाचे नाव देतो.
या आठवड्याच्या सुरुवातीला उदयपूरमध्ये लग्नाच्या विधी सुरू झाल्या. सोमवारी, या जोडप्याने पाहुण्यांसाठी एका भव्य डिनरचे आयोजन केले होते, ज्यामुळे उत्सवाची अधिकृत सुरुवात झाली. मंगळवारी, एक मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना (विरोश प्रीमियर लीग) आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये दोन्ही कुटुंबे आणि मित्र उत्साहाने सहभागी झाले होते. सध्या सोशल मीडियावर या “शाही लग्नाचे” फोटो आणि अपडेट्सची वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
गायक अरिजीत सिंगने निवृत्तीच्या प्लॅनबाबत दिले स्पष्ट संकेत, म्हणाले पुढे काय होईल कोण जाणे


