Friday, February 3, 2023

गोविंदाशी पंगा घेणे असरानी यांना पडले होते महाग, भांडणामुळे झाले होते त्यांचे थेट निलंबन

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा ‘गोविंदा’ बस नावच पुरेसे होते. त्या काळी फक्त याच एका नावावर सिनेमे सुपरहिट व्हायचे. गोविंदाचा डान्स, त्याची कॉमेडी, त्याची ऍक्शन आदी सर्वच गोष्टींसाठी लोकं त्याच्यासाठी वेडे होते. गोविंदाने जी लोकप्रियता, जे यश आणि जी प्रसिद्धी मिळवली ती खरंच स्वप्नवतच होतीच. आज जरी गोविंदा या सर्व गोष्टींपासून आणि चित्रपटांपासून लांब असला तरी त्याला आजही मोठी फॅन फॉलवोइंग आहे. जवळपास दशकं गोविंदाने बॉक्स ऑफिसवर आणि चित्रपटगृहांवर अक्षरशः राज्य केले.

गोविंदाने ९० च्या दशकात तर जो सिनेमा केला होत सुपरडुपर हिट ठरला. त्या काळी तो हिरो नं १ म्हणून ओळखला जाऊ लागला. आंटी नंबर 1, कुली नंबर 1, हीरो नंबर, जोड़ी नंबर 1 आदी अनेक सिनेमांनी गोविंदाला सुपरस्टारचा ताज मिळवून दिला. त्याच्या अशाच एका हिट चित्रपटांच्या यादीतील एक सिनेमा म्हणजे ‘दूल्हे राजा’. या सिनेमा एक धमाल कॉमेडी सिनेमा होता. चित्रपटाचे नाव ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असेल. इतका मजेशीर हा सिनेमा होता. सिनेमा आणि सिनेमातील प्रत्येक सीन तुफान कॉमेडी होता. या सिनेमाचे मुख्य वैशिष्ट्य होते ते सिनेमातील स्टारकास्ट गोविंदा, कादर खान, असरानी, रवीना टंडन आदी अनेक दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात होती.

‘दूल्हे राजा’ सिनेमात असरानी यांनी एका भ्रष्ट पोलिसांची भूमिका साकारली होती, जो गरीब लोकांना आणि दुकानदारांना खूप त्रास देतो त्यांच्याकडून फुकटात वस्तू घेतो. सर्वच लोकं त्याला कंटाळलेला असतात. त्याच्या त्रासापासून सर्वांना वाचवण्यासाठी गोविंदा असे काही करतो की, त्याचे थेट सस्पेन्शन होते. सिनेमातील हा सीन खूपच मजेशीर असून, आजही हा सीन बघताना सर्वांना नक्कीच हसायला येत असेल. १९९८ साली आलेल्या या सिनेमात गोविंदा आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत होते. आज जरी गोविंदा चित्रपटांमध्ये अगदीच कमी दिसत असला तरी तो विविध रियॅलिटी शोमध्ये बरयाचदा हजेरी लावताना दिसतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा