बाॅलिवूडची सदाबहार आणि सुप्रसिद्ध एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या आजही अत्यंत सुंदर आहे. ७० च्या दशकात त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लाखो प्रेक्षकांचे हृदय जिंकले. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, ज्यांना रेखा आवडतात. तर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा रेखा यांच्यासाठी नेहमीच खास आहे. इतकेच नाही तर २०१७ मध्ये शाहरुख खानबद्दल बोलताना रेखा भावुक देखील झाल्या होत्या. हेच नाही तर त्यांनी शाहरुख खानच्या निगडीत काही मजेदार किस्से देखील सांगितले.

रेखा यांनी शाहरुख खानसाठी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी गुलजार यांची शायरी देखील सादर केली होती. रेखा यांनी गुलजार यांच्या शायरीच्या ओळी वाचल्या आणि म्हणाल्या, “आपने किसी आत्मा को फील किया है, देखा है? शरीर जब शरीर जलता है तो राख बन जाता है, मगर जब आत्मा जलती है तो हीरा बनती है. मैंने आत्मा कभी नहीं देखी. लेकिन जिंदगी में उसे महसूस किया है’.” या ओळी त्यांनी शाहरुखसाठी म्हटल्या होत्या. इतकेच नाही नाही तर शाहरुख खानबद्दल त्या पुढे म्हणाल्या, “मला नाही माहिती त्या माणसाने त्याच्या आत्म्याला किती वेळा मारले असेल. म्हणूनच आज तो हिऱ्यासारखा चमकत आहे. त्याच्याकडे किती कौशल्य, कलागुण आहेत आणि तो किती प्रेमळ आहे हे देखील सर्वांनी पाहिले आहे. हे सांगत असताना रेखा भावुक देखील झाल्या होत्या.
रेखा यांनी एका कार्यक्रमात शाहरुख खानशी संबंधित काही किस्से सांगितले. रेखा म्हणाल्या आम्ही विमानाने प्रवास करत होतो आणि मी रात्रंदिवस शूटिंग करून कंटाळले होते. मी झोपली होती आणि डोळे उघडले तेव्हा मला एक आवाज ऐकू आला ‘रेखाजी रेखाजी कृपया उठा आणि खिडकी खाली करून बाहेर बघा किती सुंदर दृश्य आहे.’ सूर्यास्त आहे तो पाहा त्यानंतर झोपा.

रेखा पुढे सांगताना म्हणाल्या मला सूर्यास्त काही दिसला नाही पण मी हळूच पाठीमागे वळून पाहिले. तेव्हा मला शाहरुख खान दिसला. मी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि विचार केला की, हा तर आपल्याच रांगेतला दिसतोय. रेखा यांनी शाहरुख खानचा चित्रपट ओम शांती ओम मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-