सुपरस्टार असूनही दिलीप कुमारांसाठी शाहरुख खानने अंथरले होते रेड कार्पेट, तुमचेही मन जिंकेल हा व्हिडिओ


बुधवारी (७ जुलै) हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या दु:खातून अजूनही चाहते सावरले नाहीत. त्यांच्याशी निगडीत अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याप्रमाणे पसरत आहेत. हे सर्व पाहून चाहते पुन्हा एकदा भावुक होत आहेत. अशातच त्यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुपरस्टार शाहरुख खान दिलीप कुमार यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरताना दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळत असून ते किंग खानची प्रशंसा करत आहेत.

इतका मोठा स्टार असूनही तो कार्पेट अंथरत आहे, असे म्हणत चाहते त्याची प्रशंसा करत आहेत. यापूर्वी दिलीप कुमारांच्या निधनानंतर तो सायरा बानो यांना सावरताना दिसला होता. त्यावेळीही चाहत्यांकडून त्याची प्रशंसा करण्यात आली होती. मात्र, काहींनी त्याला ट्रोलही केले होते. मात्र, सध्या त्याच्या व्हायरल होत असलेला कार्पेटचा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. (When Superstar Shah Rukh Khan Rolled Out Red Carpet For Dilip Kumar And Saira Banu See Video)

हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दिसते की, शाहरुख एका पुरस्कार सोहळ्यात दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरत आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो येताच शाहरुख त्यांची गळा भेट घेतो. पुरस्कार सोहळ्यात उपस्थित सर्व कलाकार त्यांच्या सन्मानासाठी उभे राहतात.

यापूर्वीही दिलीप कुमार यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुरस्कार सोहळ्यातील या व्हिडिओत ते सायरा बानो आणि शाहरुखसोबत दिसत आहेत. शाहरुखने त्यांना प्रश्न विचारला की, त्यांच्याकडे अशी कोणती क्वालिटी होती, जिने त्यांच्या सर्व चित्रपटांना इतके टिकाऊ, दीर्घकाळ चालणारे आणि अप्रतिम बनवले.

या प्रश्नाचे उत्तर देताना दिलीप कुमार म्हणाले होते की, “सौभाग्य, भरपूर मेहनत, प्रामाणिकपणा, एकजुटता, संगत आणि या सर्वांवर कोणताही अभिनेता त्या पात्रापेक्षा मोठा होऊ शकत नाही, जे तो साकारत आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, पात्र, कथा आणि पटकथा. कोणत्याही चांगल्या किंवा टिकाऊ परफॉर्मन्ससाठी तुमच्याकडे एक चांगली कथा, चांगले पात्र समीकरण, आवाजाचा संघर्ष आणि पुरेशी शक्यता असणे आवश्यक आहे.”

शाहरुख खान हा दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचा मानलेला मुलगा आहे. जेव्हा शाहरुख सायरा यांच्याकडे पोहोचला, तेव्हा त्या पूर्णपणे खचल्या होत्या. जशी एखादी आई आपल्या मुलाला पाहून आपले अश्रू रोखू शकत नाही. शाहरुखनेही एका मुलाप्रमाणे सायरा यांना सावरले. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील दु:खाने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले.

दिलीप कुमार यांना बुधवारी (७ जुलै) राजकीय सन्मानाने शेवटचा निरोप देण्यात आला. त्यांना मुंबईच्या सांताक्रूझ येथील कब्रिस्तानात सुपूर्द-ए-खाक करण्यात आले. दिलीप कुमारांच्या जाण्याने सायरा पूर्णपणे तुटल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नीतू कपूर सूनेला ठेवतील एखाद्या ‘राणीप्रमाणे’; रिद्धिमा कपूरने सांगितले कसे असेल सासू-सूनेचे नाते

-ओळखा पाहू कोण? सोशल मीडियावर रंगलीय ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोचीच चर्चा

-चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार संजय लीला भंसाळीचा ‘गंगुबाई काठियावाडी’; पाहिजे तितकी वाट बघायला निर्मात्यांची तयारी


Leave A Reply

Your email address will not be published.