भारतीय परंपरा देशाबाहेरही! हॉलिवूड स्टार सिल्वेस्टर स्टॅलोनने हरिद्वारमध्ये घातले होते मुलाचे श्राद्ध

when sylvester stallone sent his family to haridwar to perform shradh for his son who died in 2012


आपल्या देशातील संस्कृती, सभ्यता आणि धर्मात इतकी विविधता आणि सामर्थ्य आहे की, बर्‍याच वेळा परदेशी लोकही त्याकडे आकर्षित होतात. तुम्ही बॉलिवूड सेलेब्स अनेकदा मंदिर-मशिदीत जाताना पाहिले असतील. पण तुम्हाला माहित आहे का की, हॉलिवूड स्टार्ससुद्धा भारतीय परंपरा मानतात. होय, हे खरे आहे. एकदा हॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार सिल्वेस्टर स्टॅलोनने त्यांच्या परिवाराला हरिद्वारला पाठवले होते, जिथे त्यांच्या मुलाचे पिंडदान केले गेले.

काही वर्षांपूर्वी सिल्वेस्टरचे सावत्र भाऊ त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांसह हरिद्वारला पोहोचले होते. तिथे त्यांनी हिंदू विधीनुसार त्यांच्या मुलाचे पिंडदान केले. या गोष्टीने त्यावेळी माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

सन 2012 मध्ये, सिल्वेस्टर यांच्या मुलाचे निधन झाले होते. यापूर्वी सेज स्टेलॉनचा मृत्यू औषधे अति प्रमाणात घेतल्यामुळे झाला आहे, असे वृत्त होते. त्यानंतर सेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. खूप लहान वयातच सेज स्टेलॉनने जगाचा निरोप घेतला होता.

मुलाच्या आकस्मित निधनाने सिल्वेस्टर यांना खूप मोठा धक्का बसला होता. वृत्तानुसार, त्यांनी त्यांच्या मुलाला स्वप्नात पाहिले, तेव्हा त्यांना वाटले की तो खूप अस्वस्थ आहे आणि त्याचा आत्मा समाधानी नाही. त्यांना दररोज रात्री अशीच स्वप्ने पडू लागली आणि ते काळजीत पडले. त्यांनी ठरविले की, हिंदू धर्मातील लोक ज्याप्रकारे आपल्या प्रियजनांचे पिंडदान करतात, तसेच आपल्या मुलासाठीही करावे.

यानंतर सिल्वेस्टर यांनी त्यांच्या भावासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना हरिद्वारला पाठवून त्याचे पिंडदान केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी मुलाच्या आत्म्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला होता. यासाठी त्यांनी ज्योतिषाचार्य डॉ. प्रितीक मिश्रापुरी यांच्याशी संपर्क साधला आणि इथूनच त्यांना हिंदू श्राद्ध कर्माची माहिती मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मिका सिंगच्या हिंदी गाण्यावर थिरकली खेसारी आणि शिल्पीची जोडी, व्हिडिओला २ महिन्यातच ४ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर

-बोल्ड अभिनेत्री निया शर्मा घालतेय मैत्रिणीसोबत राडा!! भर रस्त्यावर शूट केलेल्या व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.