Saturday, April 20, 2024

जेव्हा लिपलॉकसाठी ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीच्या मागेच लागले दिग्दर्शक, पाहा नेमके झाले काय होते

सिनेसृष्टी अनेक काळापासून ड्रग्स, लैंगिक शोषण अशा अनेक गोष्टींमुळे बदनाम झालेली आहे. अनेकवेळा दिग्दर्शक कलाकारांना स्क्रिप्टमध्ये नसलेली कामे देखील करायला सांगतात. अशा प्रकारची तक्रार अनेक कलाकार करताना दिसतात. अशात यामध्ये बॉलिवूडला टक्कर देणारी भोजपुरी इंडस्ट्री देखील शामिल आहे. भोजपुरी अभिनेत्री शुभी शर्माने तिच्या अभिनयाने आज अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. अनेक दिग्गज कलाकारांबरोबर तिने अभिनय केला आहे. परंतु एकेकाळी तिला देखील मोठ्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागला आहे.

शुभी शर्माने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याआधी तिचे कुटुंबीय तिला रोखत होते. तिच्या वडिलांना तिने अभिनयामध्ये नाव कमवावे हे मान्य नव्हते. त्यांनी तिला खूप समजावले आणि विरोधही केला. कला विश्वातील अनेक वाईट गोष्टी त्यांच्या कानी पडत होत्या. आपल्या मुलीवर देखील असे वाईट प्रसंग येऊ नयेत, अशी त्यांना भीती होती. त्यामुळे ते तिला विरोध करत होते. परंतु तिने कुणाचेही न ऐकता अटीतटीचा सामना करत, आज यशाचे शिखर गाठले आहे. परंतु त्यावेळी तिला कुटुंबीयांसह नातेवाईक देखील चित्रपटांमध्ये काम करते म्हणून टोमणे मारायचे. तिच्या विषयी वाईट बोलायचे, तरी देखील तिने जिद्दीने अभिनयामध्ये आपले पाय खंबीरपणे रोवले. (When the director went after Bhojpuri heroine for lip lock know what was the whole matter)

या दरम्यान तिच्या आयुष्यात एक वाईट प्रसंग घडला. या घटनेमधून तिला खुप काही शिकायला मिळाले, परंतु जेव्हा तिच्या आयुष्यात तो प्रसंग आला होता, तेव्हा ती खूप घाबरली होती. चित्रपटसृष्टी सोडून द्यावी असे तिला वाटत होते. तिच्या मनामध्ये अनेक वाईट विचार येत होते. कारण या प्रसंगाने तिला बाबांच्या शब्दांची आठवण करून दिली होती.

दिग्दर्शकाने सांगितले होते लीप लॉक करायला
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने या प्रसंगाविषयी सांगितले की, “एका चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगमध्ये मी अभिनय करत होते. त्यावेळी दिग्दर्शक अचानक माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, गाणे संपल्यावर तुला हिरोला लीप लॉक किस करावे लागेल. मला ही गोष्ट पटली नाही त्यामुळे मी त्याच्याकडे गाण्याची स्क्रिप्ट मागितली. परंतु तिथे कोणीही मला स्क्रिप्ट देत नव्हते.”

दिग्दर्शक ऐकायला तयार नव्हता
त्यानंतर अभिनेत्रीला स्क्रिप्ट देण्यात आली. तिने ती स्क्रिप्ट वाचल्यावर त्यामध्ये किस सीनची आवश्यकता नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने या विषयावर दिग्दर्शकाबरोबर खूप वेळ बातचीत केली. बरीच बाचाबाची झाली. परंतु दिग्दर्शकाला किस सीन पाहिजेच होता.

रागामध्ये झाली होती लाल बुंद
दिग्दर्शक ऐकत नसल्याने अभिनेत्री खूप भडकली. ती म्हणाली की, “मी लीप लॉक सीन देणार नाही, गाणं करायचं, तर करा नाही, तर मी चालले.” तिच्या या धमकीने निर्माते घाबरले आणि त्यांनी तिची समजूत काढत दिग्दर्शकास कोणताही सीन जबरदस्तीने घेऊ नका, असे सांगितले. त्यानंतर या गाण्याचे शूटिंग पुढे सुरु राहिले. या प्रसंगानंतर ती पुन्हा दिग्दर्शकांना भेटली आणि म्हणाली की, “सगळेच कलाकार अशा गोष्टी सहन नाही करत.” यानंतर संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंगवेळी ते तिच्यापासून सावधच राहत होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

हे देखील वाचा