Wednesday, June 26, 2024

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम होता ऋषी कपूर यांचा चाहता, त्यांना ‘ही’ गोष्ट गिफ्ट करण्याची होती इच्छा

ऋषी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे अभिनेते होते, ज्यांनी आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या काळात ऋषी कपूर यांनी सर्वांना वेड लावले होते, पण ‘१०२ नॉट आऊट’ सारख्या चित्रपटात त्यांच्या जबरदस्त अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले होते. ऋषी कपूर (rushi kapoor) यांच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत एक नाव असे देखील आहे, ज्याला संपूर्ण जग अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखते. तो म्हणजे भारतात दहशत निर्माण करणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे. आज ऋषी कपूर यांची जयंती आहे. चला तर जाणून घेऊया काही खास माहिती…

दाऊद इब्राहिमला ऋषी कपूर खूप आवडायचे. एवढेच नाही, तर एकदा ऋषी दाऊद इब्राहिमला भेटले होते. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉनने त्यांच्यासाठी शूज खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. खुद्द ऋषी यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात याचा खुलासा केला आहे. या पुस्तकात ऋषी यांनी दाऊद इब्राहिमच्या दोनदा समोरासमोर आलेल्या दिवसांचा उल्लेख केला आहे.

ऋषी कपूर यांचा चाहता होता दाऊद
ऋषी यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात चिंटूजींनी लिहिले आहे की, दोघे एकदाच भेटले होते. ही बैठक दुबईत झाली. ऋषी दाऊदला त्याच्या घरी भेटायला गेले होते. दाऊदकडून ऋषी कपूर यांना चहासाठी बोलावण्यात आले होते. त्यांना चहासाठी बोलावण्यात आले कारण दाऊदने सांगितले की, तो दारू पितो नाही किंवा देत नाही.

मॉलमध्ये झाली दुसरी भेट
एकदा ऋषी आणि नीतू कपूर दुबईतील एका मॉलमध्ये फिरत असताना दाऊदही तिथे उपस्थित होता. ते त्यांच्या ८ ते १० बॉडीगार्डसह उपस्थित होते. ऋषी यांना पाहताच दाऊद म्हणाला, “तुम्हाला जे पाहिजे ते घ्या.” जेव्हा ऋषी यांनी हे नाकारले तेव्हा दाऊदने सांगितले की, तो त्यांचा खूप आदर करतो आणि त्यांच्यासाठी स्वत: काहीतरी खरेदी करू इच्छितो.

दाऊदसोबत घालवले चार तास
ऋषी यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये दाऊदसोबत ४ तास घालवल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर बोलले असल्याचे त्यांनी सांगितले. दाऊदने बॉलिवूड कलाकारांबद्दल आपले मत मांडले आणि त्याला इंडस्ट्रीतील कोणते कलाकार आवडतात ते सांगितले. यासोबतच ऋषी यांनी बायोग्राफीमध्ये असेही लिहिले आहे की, दाऊदला भारतात केलेल्या गुन्ह्यांची लाज किंवा दु:ख नाही. याशिवाय राज कपूर यांचे निधन झाले, तेव्हाही दाऊदने ऋषी कपूर यांच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी एका व्यक्तीला पाठवले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
सोहेल खानच्या दोन मुलांची आई बनल्यानंतर एक्स पत्नीचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाली, ‘मला महिलाच…’
रणबीरने ‘त्या’ कृतीने जिंकले राजामौलींचे मन, दिग्दर्शकांनीही अभिनेत्याला कडकडून मारली मिठी, एकदा पाहाच
फोटोत दिसणारी निरागस मुलगी आहे सुपरस्टारची आई अन् दिग्गज हिरोची पत्नी, ओळखलं का?

हे देखील वाचा