Friday, April 19, 2024

जेव्हा अनुष्का शर्मासाठी पत्रकारावर चिडत, विराटने केली होती त्याला शिवीगाळ; BCCI नेही दिली होती वॉर्निंग

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नाते खूप जुने आहे. अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींनी मैदान गाजवणाऱ्या क्रिकेटर्ससोबत लग्न करत संसार थाटला आहे. या दोन्ही क्षेत्रांना भारतमध्ये कमालीचे महत्व आहे. सध्याच्या घडीला सिनेमा आणि क्रिकेट अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये चांगलीच लोकप्रिय असणारी, गाजणारी, प्रसिद्ध जोडी म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. ही जोडी फॅन्सची आवडती तर आहेच, शिवाय मीडियाची देखील सर्वात आवडीची आणि लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. अनुष्का आणि विराटबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकाला खूप आवडते. आज आम्ही तुम्हाला या दोघांचा असाच एक किस्सा सांगणार आहोत.

वर्ल्डकप २०१५ आधी टीम इंडिया माडर्क युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स ओव्हल इथे सराव करत होती. त्यावेळी विराट चेंजिंग रुमजवळ बसलेल्या पत्रकाराजवळ आला आणि त्याने त्या पत्रकाराला बोलण्यास सुरवात केली. तो त्या पत्रकारांवर खूप चिडला आणि रागाच्या भरात तो त्या पत्रकाराला भरपूर बोलत होता. त्या पत्रकाराला आणि इतरांना समजतच नव्हते विराट एवढा का चिडला आहे. तेव्हा त्या पत्रकाराने त्याला सांगितले की, तो खूप मोठा आणि सिनिअर खेळाडू असून त्याला असे वागणे, शिव्या देणे चांगले दिसत नाही. यावर विराट अजून भडकला.

विराट इतका चिडला होता की त्याला शांत करायला देखील सर्व घाबरत होते. अशा वेळी भारतीय टीमचे गोलंदाजी कोच भारत अरुण आणि टीमचे मीडिया मॅनेजर आर.एस, बाबा यांनी पुढे येत विराटला सावरले. त्यानंतर त्याने विराट आणि अनुष्काबद्दल वृत्तपत्रातील एक बातमी दाखवली. त्याच बातमीमुळे तो चिडला होता. पण या बातमीशी त्या पत्रकाराचा काहीच संबंध नव्हता. हे जेव्हा पत्रकाराने विराटला सांगितले तेव्हा तो शांत झाला. त्याला त्याची चूक समजली आणि त्याने त्या पत्रकाराची माफी देखील मागितली होती. मात्र या घटनेमुळे BCCI विराटला त्याच्या चुकीच्या वागणुकीतीसाठी वॉर्निंग देखील दिली होती. त्याच्या या शिवीगाळची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती.

सध्या अनुष्का आणि विराट त्याच्या मुलीशी इंग्लंडमध्ये असून लवकरच इंडिया आणि इंग्लंड यांची सिरीज सुरु होणार आहे. हे दोघेही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा