Sunday, June 23, 2024

गल्ल्या-बोळीत राहणाऱ्या महिलेची अस्सल इंग्रजी पाहून नेटकरी थक्क, ‘या’ कारणामुळे भीक मागून करावा लागतोय उदरनिर्वाह

देशाच्या कानाकोपऱ्यात टॅंलेट आहे, असे म्हटले जाते. अनेकवेळा काही कारणामुळे व्यक्तीमधील कौशल्यांना अपेक्षित यश मिळत नाही. आपण नेहमी सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिभेचे दर्शन घडवणारे व्हिडिओ पाहतो आणि शेअरही करतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वाराणसीच्या गल्ल्या-बोळीत राहणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या महिलेचे नाव स्वाती असे असून, तिने आपल्या टॅलेंट आणि हुशारीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. व्हिडिओमध्ये स्वाती आश्चर्यकारक पद्धतीने इंग्रजी बोलत आहे, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आश्चर्य म्हणजे, स्वाती भीक मागून उदरनिर्वाह करते. हा व्हिडिओ शारदा अविनाश त्रिपाठी या एक युजरने फेसबुकवर शेअर केला आहे, जो बघता बघताच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये ती महिला प्रत्येक गोष्टीला अस्सल इंग्रजीत उत्तर देताना दिसत आहे. (woman living in streets of varanasi surprised people with fluent english watch video)

https://www.facebook.com/100003445884950/videos/207490721511936/

स्वाती ही मूळची दक्षिण भारतातील असून, तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीही घेतली आहे. मात्र परिस्थितीमुळे तिला भीक मागून जगावे लागत आहे. स्वातीने व्हिडिओमध्ये सांगितले की, ती तिच्या कुटुंबासोबत चांगले जीवन जगत होती. पण पहिल्या मुलाच्या जन्मानंतर तिच्या शरीराच्या उजव्या बाजूला अर्धांगवायू झाला, त्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले.

स्वातीला तिच्या कौशल्याच्या जोरावर नोकरी करण्याची इच्छा आहे, पण तिला कुठूनही नोकरी करण्याची संधी मिळत नाहीये. स्वातीने सांगितले की तिला टायपिंग आणि कॉम्प्युटरशी संबंधित काम कसे करतात हे देखील माहित आहे. स्वाती तीन वर्षांपूर्वी वाराणसीला आली होती आणि राहिली.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युजर्सही यावर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण त्या महिलेचे कौतुक करत आहेत, तर काहीजण तिला काम मिळावे असे म्हणत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा