×

जागतिक हास्य दिन! पोट धरुन हसायला लावणारे ‘हे’ हिंदी चित्रपट चुकूनही कधी चुकवू नका

हसल्याने आयुष्य वाढतं अस म्हणतात. म्हणूनच आजच्या काळात मानवाला हसते ठेवण्यासाठी अनेक कार्यक्रम, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस हसणेच विसरला आहे. त्यामुळेच दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्यदिनही साजरा केला जातो. मात्र हसण्यासाठी नेहमीच काहीतरी विशेषच कारण असावं असही काही नाही.बॉलिवूड जगतात असे काही निवडक चित्रपटही आहेत जे पाहिले तरी तुम्ही पोटधरुन हसाल. कोणते आहेत ते गाजलेले चित्रपट चला जाणून घेऊ. 

लाफ्टर थेरपीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांमधील वाढत्या तणावावर मात करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. लोकांच्या जीवनात हसणे खूप महत्वाचे आहे. आनंदी राहण्यासाठी लोक विविध माध्यमांचाही वापर करतात. आज जागतिक हास्य दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी अशाच काही चित्रपटांची यादी तयार केली आहे, जे तुम्हाला हसायला लावतील. हे चित्रपट तुमच्या कुटुंबासोबत OTT प्लॅटफॉर्मवर घरी बसून पाहू शकता.

अंदाज अपना अपना (1994)- राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि सलमान खान मुख्य भूमिकेत होते. जितक्या वेळा तुम्ही हा चित्रपट पाहाल तितके जास्त हसाल. याशिवाय या चित्रपटातील शक्ती कपूरची कॉमेडी जबरदस्त आहे. हा चित्रपट Amazon Prime वर उपलब्ध आहे.

हेराफेरी (2000)- प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटात परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची कॉमेडी लोकांना इतकी आवडली होती की, 2006 मध्ये त्याचा सिक्वेल ‘फिर हेरा फेरी’ही आला होता. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.

भागम भाग (2006)- या चित्रपटात अक्षय कुमार, गोविंदा, परेश रावल, लारा दत्ता, राजपाल यादव, अरबाज खान, जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, रझाक खान यांच्यासह अनेक स्टार्स होतेया चित्रपटाचे दिग्दर्शन दर्शन यांनी केले होते. हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता.

गोलमाल: फन अनलिमिटेड (2006)- चार मित्रांचा मजेदार विनोदी चित्रपट ‘गोलमाल’ एक प्रचंड विनोदी कथा आहे. या चित्रपटात अजय देवगण, शरमन जोशी, अर्शद वारसी आणि तुषार कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला होता. तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.

ढोल (2017)- या चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रियदर्शनने केले होते. . या चित्रपटातील अनेक दृश्ये खूपच मजेशीर आहेत. या चित्रपटात राजपाल यादव, शर्मन जोशी, तनुश्री दत्ता आणि कुणाल खेमू दिसले होते. हे Amazon Prime वर उपलब्ध आहे.

मुन्ना भाई एमबीबीएस – या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते. या चित्रपटातील संजय दत्त आणि अर्शद वारसी लोकांना इतके आवडले होते की आज दोघेही एकाच नावाने ओळखले जातात. या चित्रपटात कॉमेडीचा जबरदस्त तडका देण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post