Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड हिजाब वादावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया; मुलींना धमकावणाऱ्यांना म्हणाले, ‘हीच का तुमची मर्दानगी?’

हिजाब वादावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया; मुलींना धमकावणाऱ्यांना म्हणाले, ‘हीच का तुमची मर्दानगी?’

सध्या कर्नाटक राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. कर्नाटक येथील उडुपी ज्युनिअर कॉलेजमध्ये हिजाबवरून सुरू झालेल्या वादाची संपूर्ण देशात चर्चा होत आहे. या प्रकरणावर राजकीय व्यक्तींपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत प्रत्येक कलाकार यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या गोष्टीला खेदजनक सांगितले आहे.

जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिले की, “मी कधीच हिजाबच्या बाजूने राहिलो नाही. मी आताही त्यावर कायम आहे, पण मी त्या मुलींच्या छोट्याशा गटाला घाबरवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांना विचारतो की, हीच तुमची ‘मर्दानगी’ आहे का? हे अत्यंत खेदजनक आहे.”

अभिनेत्री रिचा चड्ढानेही म्हटले, ‘भ्याड व्यक्तींचा गट’
जावेद यांच्यापूर्वी अभिनेत्री रिचा चड्ढानेही (Richa Chadha) ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्वीट करत लिहिले की, “आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने घडवा. भ्याड व्यक्तींचा एक गट एकट्या विद्यार्थीनीवर हल्ला करण्याला गर्वाची गोष्ट समजत आहे. हे लाजिरवाणे आहे. येत्या काही वर्षांमध्ये हे सर्व बेरोजगार, निराश आणि गरीब होतील. यांसारख्यांसाठी कोणतीही दया आणि मुक्ती नाही. मी यांसारख्या घटनांवर थुंकते.”

नेमका वाद आहे तरी काय?
जानेवारीमध्ये उडुपी येथील कॉलेजमध्ये काही विद्यार्थीनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश दिला नव्हता. त्यानंतर एक विद्यार्थीनी हे प्रकरण थेट उच्च न्यायालयात घेऊन गेली. तिने याचिका दाखल केली आणि हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश मिळावा यासाठी परवानगी मागितली. अशात कर्नाटकमधील एका कॉलेजचा व्हिडिओ समोर आला आहे. जिथे एक मुलगी कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून येते आणि आपली गाडी पार्क करते. त्यावेळी विद्यार्थ्यांचा जमाव त्या मुलीच्या दिशेने जातो आणि ‘जय श्री राम’ या नावाचे नारे लावतात. यानंतर ती मुलगीही ‘अल्ला हो अकबर’ म्हणून प्रत्युत्तर देते.

हेही पाहा- सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांदरम्यान कर्नाटकातील तापलेल्या हिजाब वादामुळे देशात चर्चेला उधाण आले आहे. जावेद अख्तर आणि रिचा चड्ढा यांच्याव्यितिरिक्त अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा