लग्नानंतर शूटिंगवर पोहोचली यामी गौतम; चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रीचे दणक्यात स्वागत


मागील काही दिवसांपासून भारतात लगीन सराई चालू होती. यातच अनेक कलाकार विवाह बंधनात अडकले असल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत. पण बॉलिवूडमधील एक लग्न मात्र जोरदार गाजलं आहे. ते म्हणजे अभिनेत्री यामी गौतम हिचे लग्न. कोणतीही पूर्व कल्पना न देता तिने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले आहे. त्यामुळे ती अनेक दिवस चर्चेत होती. लग्नानंतर आता जेव्हा यामी सेटवर शूटिंगसाठी गेली, तर टीमने तिचे दणक्यात स्वागत केले आहे. अभिनेत्रीने तिच्या स्वागताचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Yami Gautam start shooting of A Thursday movie after marriage)

यामी सध्या तिच्या ‘ए थर्सडे’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. 4 जूनला सोशल मीडियावर जेव्हा चाहत्यांनी अचानक तिच्या लग्नाचे फोटो पाहिले, तेव्हा मात्र सर्वजण हैराण झाले होते. तिने ‘उरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे.

Photo Courtesy: Instagram/yamigautam

यामीने इंस्टाग्राम स्टोरीवर पुष्पगुच्छ आणि केकचे फोटो शेअर करून संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. तिच्या या स्टोरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Courtesy: Instagram/yamigautam

यामीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती अभिषेक बच्चनसोबत ‘दसवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे जन्मलेल्या आणि चंदिगढमध्ये मोठी झालेल्या एका मुलीची कहाणी दाखवणार आहे.

तसेच तिचे पती आणि दिग्दर्शक आदित्य धर या दिवसात ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात विकी कौशल देखील आहे. जो या आधी त्यांच्यासोबत ‘उरी’ या चित्रपटात होतो.

यामीने तिच्या करिअरची सुरुवात 2012 साली रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘विकी डोनर’मधून केली होती. यानंतर तिने ‘उरी’, ‘काबिल’, ‘सनम रे’, ‘गिनी वेड्स सनी’, ‘बदलापूर’ आणि ‘बाला’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.