2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षीत असणारा चित्रपट म्हणजे ‘टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स’ हा नुकताच प्रदर्शित झाला असुन या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होउन तीन दिवस झाले आहेत. म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. ज्यामुळे त्याची तुलना धुरंधर 2 शी केली जाऊ लागली आहे. मात्र या चित्रपटाच्या कमाईत 63% घट झाली आणि रक्षाबंधनच्या सुट्टीचा यश काही फारसा फरक झाला नाही. पण ही घट होउनही या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 200 कोटींहुन अधिक कमाई केली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शिन गीतू मोहनदास यांनी केल आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कमाईत 29.30% घट झाली. चित्रपटाने पहिल्या दिवशी 101.10 कोटी, तर दुसऱ्या दिवशी 37.65 कोटी कमावले. रक्षाबंधनच्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत आणखी घट झाली. 25.5% प्रेक्षकसंख्येसह, ‘टॉक्सिक’ने तिसऱ्या दिवशी, शुक्रवारी, केवळ 26.60 कोटी कमावले. यामुळे, चित्रपटाची भारतातील एकूण निव्वळ कमाई 165.35 कोटी आणि जगभरातील कमाई 221.45 कोटी झाली.
या चित्रपटाच्या हिंदी आवृतीला सर्वात उत्तम प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. तिसऱ्या दिवशी, चित्रपटाने हिंदीमध्ये 19.15 कोटी आणि कन्नडमध्ये 5 कोटी कमावले. मात्र अजुन वीकंएडला कसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे आहे.
‘टॉक्सिक’ या चित्रपटात अभिनेता यश (yash)हा मुख्य भुमिकेत असुन यात कियारा अडवाणी, तारा सुतारिया, नयनतारा, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
हेही वाचा
आवारापन 2चा 200 कोटींचा टप्पा पार, दिशा पटानीने शीला की जवानी वर धरला ठेका










