शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर चित्रपट पठाण मधील बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. दीपिकाने भगव्या रंगाची बिकीन घातल्यामुळे अनेक राजाकारणी आणि हिंदु सेवासंघटन गटाने चित्रपटावर आवाज उठवला असून चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. या वादामध्ये नुकतंच ‘रसोडे मे कौन थी’ फेम यशराज मुखाटे याने दीपिकाच्या डायलॉगवर एक व्हिडिओ बनवला आहे. जो सोशल मीडियावप तुफान व्हायरल झाला आहे.
नुकतंच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने फीफा विश्वकप (FIFA World Cup) मध्ये ट्रॉफीचे प्रदर्शन करण्यासाठी मैदानावर हजेरी लावली होती. तेव्हा अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक स्टोरी व्हिडिओ ठेवला होता. म्यूजिक प्रोड्यूसर यशराज मुखाटे याने तो व्हिडिओ पाहून त्याचा रिमेक बनवला असून अभिनेत्रीने देखिल ती रिल आपल्या इंस्टग्राम स्टोरीला शेअर केली आहे.” व्हिडिओला पाहूण यशराज म्हणतो की, “तर काल दीपिकाने आपल्या इंस्टा प्रेफाइलला एर रील लावली होती ज्यामध्ये ती 100 बीपीएमच्या स्पीडने बोलत होती. तर मी जाहिरपणे या गाण्यामध्ये बदल केला आहे.”
क्लिपमध्ये दीपिका म्हणते की, “सध्या मला नर्व्हस वाटत आहे. पण, इतिहासातील खेळाच्या क्षणांबद्दल मला खूप कृतज्ञता वाटते. फिफा विश्वचषकात माझी ही पहिलीच वेळ आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही दोहामध्ये आहोत, पण हो हा माझा पहिला फिफा वर्ल्ड कप आहे.” दीपिकाने यशराज संगीत आणि बीटसह या संवादांना ट्विस्ट दिला आहे. जेव्हा दीपिका म्हणते की, “त्याची क्राफ्ट्समैनशिप याला अजून सुंदर बनवते.” यशराजने तिच्या या शब्दांना पकडून एक व्हिडिओ बनवला आहे. यशराजच्या या व्हिडिओवर दीपिकाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने आपल्या इंस्टावर यशराजचा ट्वीस्ट व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “दॅट इज एपिक”
View this post on Instagram
यशराजने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “मोर ब्यूटिफुल! मोर ब्यूटिफुल! दीपिका पादुकोण #FIFAWorldCup2022 #LouisVuitton #YashrajMukhate.” या व्हिडिओने सोशल मीडियावर क्रेज केली असून चाहते आवर्जून व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
तमन्ना भाटियाने शेअर केला खासगी जेटमधील फोटो, चाहत्यांनी विचारले ‘मागे विराट कोहली काय करतोय?’
‘जेलमधल्या कैदीसारखी दिसतेस’, मुलानेच उडवली मलायकाच्या स्टायलिश कपड्यांची खिल्ली