‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रियांका अन् अंशुलचे ब्रेकअप; अभिनेत्रीने लावला फसवणुकीचा आरोप


अनेकवेळा ऑनस्क्रीन रोमान्स करता करता कलाकार एकमेकांच्या कधी प्रेमात पडतात हे त्यांना देखील समजत नाही. टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे ऑनस्क्रीन काम करताना त्यांच्या सह-कलाकारांच्या प्रेमात पडले आहेत. एवढंच नाही, तर काहींनी संसार देखील थाटला आहे. अशीच एक जोडी म्हणजे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रियांका उधवानी आणि अंशुल पांडे. हे दोघे मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते. परंतु प्रियांकाने नुकतेच त्यांच्या नात्याबाबत असे काही वक्तव्य केले आहे, ज्यामुळे तिचे चाहते हैराण झाले आहेत. तसेच तिने तिच्या बॉयफ्रेंडवर आरोप देखील केला आहे.

ई-टाईम्ससोबत बोलताना प्रियांकाने अंशुलने तिला धोका दिल्याचे सांगितले आहे. तिने सांगितले आहे की, “मागच्याच महिन्यात माझे लसीकरण केले आहे. मला खूप जास्त ताप आला होता. अंशुल संध्याकाळी 7 वाजता घराच्या बाहेर गेला होता. त्याने मला सांगितले की, काही वेळातच तो परत घरी येईल. पण तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आला.” तिने सांगितले की, मागील काही दिवसांपासून अंशुल तिला फसवत‌ आहे. (Yeh rishta kya kehlata hai fame couple priyanka udhwani and ansul pandey’s break up)

तिने सांगितले की, “अंशुल मला फसवत‌ आहे. या गोष्टीची माहिती मला इंस्टाग्राम स्टोरीवरून मिळाली आहे. त्यावरून मला असे जाणवले की, तो दुसऱ्या मुलीसोबत आहे.‌ मी आमचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मी सोशल मीडियावर देखील पोस्ट केली आहे.” तिने सांगितले की, ब्रेकअपनंतर तिला खूप स्वतंत्र वाटत आहे. कारण त्यांचे नाते एका अशा ठिकाणी आले होते. जिथे तिला पाऊलं उचलणं गरजेचं होतं.

प्रियांकाने केलेल्या या आरोपानंतर अंशुलने देखील स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला की, “प्रियांकाला माझ्याबाबत सगळ्या गोष्टी माहीत आहेत की, मी कोणासोबत जातो, काय करतो, किती वेळ असतो? ती म्हणाली की, तिला वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायला नाही आवडत. पण आता प्रियांकाने माझ्यावर धोका देण्याचा आरोप लावला आहे, तो चुकीचा आहे. कोणीही ही गोष्ट समोरच्या व्यक्तीला केवळ खाली पाडण्यासाठी नाही, तर पुराव्यासोबत मांडली पाहिजे.”

अंशुल आणि प्रियांका गेल्या 6 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. ते अनेक वेळा त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असायचे. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांची जोडी खूप आवडत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणात मराठमोळ्या उमेश कामतच्या फोटोचा वापर, संतप्त अभिनेत्याकडून कारवाईचा इशारा

-आम्ही घेतली कोरोनाची लस! कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

-‘हिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि…’, म्हणत युजरने केले उर्वशीला ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले ‘असे’ प्रत्युत्तर


Leave A Reply

Your email address will not be published.