[rank_math_breadcrumb]

यो यो हनी सिंगने शोमध्ये बेकायदेशीर लेझर लाईटचा केला वापर, आता प्रमोटर्सविरोधात पोलिसांची कारवाई सुरु

यो यो हनी सिंग हा एक लोकप्रिय गायक आहे. तर त्याने उत्तम रॅप साँग दिले आहेत. मात्र आता तो एका वादामुळे चर्चेत आला आहे.तो वाद म्हणजे त्याच्या मुंबईतील कॉन्सर्टवरून तो आता चर्चेत आहे. विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्राजवळ बेकायदेशीर लेझर दिवे वापरल्याचे आरोप समोर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी यापूर्वीच सावधगिरीचा इशारा दिला असूनही, कार्यक्रमाच्या आयोजकांनी  कथितरित्या विमानतळ परिसराच्या अगदी जवळ अनधिकृत लेझर दिवे वापरले. यामुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विमानांच्या उड्डाणांना संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो या कारणास्तव, प्रशासनाने अशा प्रकारच्या रोषणाईसाठी स्पष्टपणे परवानगी नाकारली होती. मात्र, कार्यक्रमादरम्यान या मार्गदर्शक तत्त्वांकडे कथितरित्या दुर्लक्ष करण्यात आले.

या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे, पोलिसांनी सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी, तसेच हवाई क्षेत्राशी संबंधित नियमांना धोका निर्माण केल्याप्रकरणी कार्यक्रमाच्या प्रतिनिधीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 28  मार्च 2026 रोजी मुंबईतील ‘एमएमआरडीए मैदानावर’ घडली आहे. याप्रकरणी कार्यक्रम व्यवस्थापन कंपनीचे प्रतिनिधी असलेल्या ‘इंदरजीत सिंग‘ (singh) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तसेच या कार्यक्रमाच्या वेळी आयोजकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमाला सुमारे 12000 लोक उपस्थित राहतील असे सांगण्यात आले होते, मात्र, प्रत्यक्षात उपस्थिती 18000 ते 20000 च्या दरम्यान पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’मध्ये गर्दीच्या अंदाजाबाबतही तफावत असल्याचे समोर आले आहे. या अश्या वागण्यामुळे  प्रशासनासमोर सुरक्षेचे अतिरिक्त आव्हान उभे राहिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, ‘केजीएफ चॅप्टर 2’ला मागे टाकत लवकरच 1400 कोटींची कमाई होईल पार