×

अभिनेत्री झरीन खान ‘या’ व्यक्तीसोबत अडकणार विवाह बंधनात, लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

सध्या बॉलिवूड जगतात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत.  नुकताच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री झरिन खानही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा सूरू झाली आहे. झरीन खान (Zareen Khan)  तिचा प्रियकर शिवाषीश मिश्रासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता या चर्चांवर खुद्द अभिनेत्री झरीन खानने प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली ती नेमकं चला जाणून घेऊ. 

झरीन खान आणि शिवाशिष मिश्रा जवळपास 1 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर ही बातमी किती योग्य आणि किती चुकीची याचे उत्तर झरीन खानने स्वतः दिले आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे १ मे २०२२ रोजी मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ६१व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. झरीन खानने आपल्या या लग्नाच्या चर्चांबद्दल महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

या  लग्नाबद्दल विचारताच  झरीनने  सध्या कोणतेही लग्न होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर तिने कबूल केले की ती  आणि शिवाशिष एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत आणि प्रत्येक क्षण खूप एन्जॉय करत आहेत. त्यांच्या नात्याला एक वर्ष झाले आहे आणि ते अजूनही एकमेकांना समजून घेत आहेत. यावेळी  झरीन खानने कबूल  तिचे  आणि शिवाशिषचे  विचार खूप समान आहेत असेही आवर्जुन सांगितले. लग्नाबद्दल सध्या काहीही विचार केला नसून लग्नाच्या बेडीत अडकण्यापेक्षा दोघांचा विश्वास महत्वाचा असतो असे मत तिने मांडले आहे.

झरीन खान आणि शिवाशिष मिश्रा या दोघांनीही गेल्या वर्षी आपल्या प्रेमप्रकरणाची कबुली दिली होती . जरीनने गोव्याच्या सुट्टीचा फोटो शेअर करत शिवाशिषला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर ते  अनेकदा एकत्र फिरताना दिसले होते. झरीन तिच्या चित्रपटांइतकीच सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post