[rank_math_breadcrumb]

प्रेक्षक म्हणतात – हीच खरी लव्हस्टोरी हवी होती!

मोहित सूरीचा ‘सैयारा’ (Saiyaara) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. अहान पांडेच्या ‘सैयारा’ चित्रपटसाठी प्रेक्षक अक्षरशः वेडे झालेत. चित्रपट लागल्यावर सिनेमागृहात मध्ये गर्दीच गर्दी झाली. इतकी की फक्त तीन दिवसांतच चित्रपटाने आपला खर्च भरून काढला! जाणून घेऊया ती मजेशीर कारणं, ज्यामुळे अहान पांडेचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

‘सैयारा’ मधली सगळी गाणी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेली आहेत. चित्रपट येण्याच्या आधीच ही गाणी प्रदर्शित झाली होती आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती. ‘सैयारा’चं टायटल सॉंग, ‘बर्बाद’, ‘धुन’, ‘राहों में तेरी’ ही सगळी गाणी सुपरहिट ठरली. विशेष म्हणजे ही गाणी गायला अरिजीत सिंग, जुबिन नौटियाल, श्रेया घोषाल, विशाल मिश्रा आणि सचेत-परंपरा सारख्या टॉप सिंगर्सना घेण्यात आलं होतं आणि त्यांच्या आवाजाचं जादू थेट प्रेक्षकांच्या हृदयात उतरलं.

‘सैयारा’ प्रदर्शित होण्यापूर्वीच दिग्दर्शक मोहित सूरी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की,हा चित्रपट आधी ‘आशिकी 3’ या नावानं बनवायचं ठरलं होतं. पण नंतर मुकेश भट्ट आणि भूषण कुमार यांच्यात काही वाद झाले आणि मग चित्रपटचं नाव बदलून ‘सैयारा’ ठेवलं. आता ‘आशिकी 2’ आधीच हिट झालेला होता, त्यामुळे ‘सैयारा’चा त्याच्याशी असलेला जुना कनेक्शन ऐकून प्रेक्षक या नव्या चित्रपटसाठी अजूनच उत्सुक झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांना एक सुंदर प्रेमकथा पाहायची होती. पण गेल्या काही काळात फक्त अ‍ॅक्शन आणि हॉरर चित्रपटच जास्त आले. अशातच ‘सैयारा’ मुळे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एक गोड, हृदयस्पर्शी लव्हस्टोरी पाहायला मिळाली आणि तीही सुखद शेवटासह!

फिल्म क्रिटिक तरण आदर्श म्हणाले, ‘सैयारा’ हिट होण्यामागे एक खास कारण होतं या चित्रपटातले कलाकार प्रदर्शितच्या आधी कुठेच लोकांसमोर आले नाहीत. ना कुठल्या इव्हेंटला गेले, ना कुठल्या मुलाखती दिल्या, ना पॉडकास्ट केलं. त्यामुळे लोकांच्या मनात जास्त उत्सुकता निर्माण झाली, की हे कलाकार कोण आहेत आणि चित्रपट कसा असेल! ‘सैयारा’ प्रदर्शित होण्याआधी फक्त दिग्दर्शक मोहित सूरी यांनीच मिडियाशी संवाद साधला. त्यांनी केवळ चित्रपटाशी संबंधित आणि महत्त्वाच्या गोष्टींवरच चर्चा केली. त्यांचं संपूर्ण लक्ष फक्त चित्रपटावर केंद्रित होतं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

‘दुश्मन’ चित्रपटामधील खुनी आजही लाेकांच्या मनात येताे !