Thursday, March 28, 2024

अंगावर काटा आणणारी बातमी! 20 वर्षीय अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर फाशी घेत संपवलं आयुष्य

सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल‘ची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तुनिशा 20 वर्षांची होती. तुनिषाने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सेटवर उपस्थित लोकांनी तुनिषाला तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण वाटेतच अभिनेत्रीचा मृत्यू झाला. आता तिचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी भिवडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सोनी सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये तुनिशा (tunisha sharma ) राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंग’, ‘दबंग 3’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कॅटरीना कैफची भूमिका साकारली होती. कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव’ ही मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली हाेती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. नेहमी खुश राहणाऱ्या आणि सेटवर सगळ्यांशी मन माेकळेपणाने बाेलणाऱ्या या अभिनेत्रीने असे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

तुनिषाचा अली बाबा हा नवा शो काही काळापूर्वी सुरू झाला होता. या मालिकेबद्दल अभिनेत्री खूप उत्सुक होती. तिला विश्वास होता की, बऱ्याच काळानंतर ती पुन्हा एकदा टीव्हीवर एक पीरियड ड्रामा करत आहे, ज्यामध्ये ती अनेक चॅलेंजिंग लूक ट्राय करू शकते. तिच्या चाहत्यांनाही त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीची ही स्टाईल आवडली होती.(tv actress tunisha sharma commits suicide at the age of 20 actress hanged herself at her tv serial set ali baba dastaan e kabul)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनन्या पांडेच्या घायळ अदा, पाहुन तुम्हीही व्हाल फिदा

आईच्या कुशीत बसलेली चिमुकली आहे बॉलिवूडची सुपरस्टार, तुम्ही ओळखलं का?

हे देखील वाचा