Saturday, August 22, 2026
Home बॉलीवूड करीना कपुरच्या तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवक सबा अली खान भडकल्या म्हणाल्या – जगा आणि जगू द्या

करीना कपुरच्या तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवक सबा अली खान भडकल्या म्हणाल्या – जगा आणि जगू द्या

अभिनेत्री करीना कपुर खान सध्या एका व्हिडीओमुळे चर्चत आली आहे. तिचा एक जीम वरुन परतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि त्या दरम्यान तिचे पोट हे बेबी बंप सारखे दिसत असल्याने नेटकऱ्यांनी ती प्रेग्नेंट आहे का असा अंदाज लावला. मात्र करिना कपुरच्या टिमने या अफवांना फेटाळुन यात काहीही तथ्य नाही असे म्हणले आहे. तर करिना कपुरची मोठी ननंद सबा अली खान पटौदी यांनीही व्हयरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आणि अभिनेत्रीच्या गरोदरपणाच्या दाव्यांवर नाराजी व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. 

सैफ अली खानची बहिण आणि करीना कपूरची ननंद यांनी इन्स्टावर करीनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल झाल्यापासुन तिच्या गरोदरपणाच्या अफवांना पुर्णविराम देण्यासाठी सबाने पोस्टद्वारे करीना गरोदर नाही आणि लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निराधार अंदाज लावण्यापासुन परावृत होण्याचे आवाहनही केले आहे.

सबाने इंस्टा स्टोरीवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले की, “चुकीच्या अँगलने काढलेला फोटो किंवा व्हीडिओने खराब हेअरस्टाईलमुळे ते विचित्र दिसू शकते, मात्र हे  लोक इतके चुकीचे निष्कर्ष कसे काढु शकतात. आणि मित्रांनो तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि इतरांना त्यांच जगु द्या काहि गोष्टी खाजगीच राहिल्या पाहिजेत. विनाकारण अंदाज लावण्याची गरज नाही.

करीनाने (Karina)2012 मध्ये सैफ अली खानशी लग्न केले. त्यानंतर 2016 मध्ये तिने तिचा पहिला मुलगा तैमुर ला जन्म दिला आणि 2021 मध्ये तिच्या दुसऱ्या मुलाचे, जहांगीर याचे जगात स्वागत केले करीना कपूरच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास सिंघम अगेन मध्ये दिसली होती तर सैफ अली खान हा कर्तव्य मध्ये दिसला होता.

हेही वाचा

‘टॉक्सिक’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद, आतापर्यत इतक्या कोटीची झाली कमाई

हे देखील वाचा