Saturday, August 22, 2026
Home साऊथ सिनेमा ‘टॉक्सिक’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद, आतापर्यत इतक्या कोटीची झाली कमाई

‘टॉक्सिक’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद, आतापर्यत इतक्या कोटीची झाली कमाई

अभिनेता यश (yash)याचा बहुप्रतिक्षीत चित्रपटक्सिक’ हा पुढच्या आठवड्यात रिलीज साठी सज्ज आहे. ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ साठी संपूर्ण भारतात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे आणि चित्रपटाला दमदार ओपनिंग मिळाली आहे. तर सध्या हा चित्रपट रीलीज पुर्वीच ॲडव्हान्स बुकिंग मधुन उत्तम कमाई करत आहे. या चित्रपटाने जवळपास 85000 तिकेटे प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच विकली गेली ज्यात कर्नाजकचा वाटा जास्त आहे.

‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट गीतू मोहनदास दिग्दर्शित आहे. तर या चित्रपटाचे इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्क नुसार पहिल्या दिवशी संपुर्ण भारतात 85000 तिकिटे विकली असुन 4886 शोजमधुन रु 4.10 कोटींची कमाई केली आहे. या आकडेवारीत ब्लाॅक केलेल्या जागांचा समावेश नाही. तर ब्लाॅक केलेल्या जागांसह एकुण ॲडव्हान्स बुकिंग रु 9.19 कोटी झाले आहे. मात्र हा चित्रपट रीलीज साठी 5 दिवस बाकी आहे. त्यामुळे यात वाढ होण्याची शक्यता आहे.

‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट काही दिवसांपुर्वी रिलीज होणार होता मात्र काही चित्रपट त्याच दरम्यान रिलीज होणार होत्या त्यामुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तर याला सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन कडून मंजुरी मिळाली आहे. या चित्रपटाचा कालावधी 3 तास 12 मिनिटे आहे. तर सेन्सॉर बोर्ड कन्नड आणि इंग्रजी आवृत्तीमधील दोन शब्द म्युट करण्यास किंवा बदलण्यास सांगितले आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनापुर्वी हैदराबादमध्ये एक भव्य प्री-रीलीज कार्यक्रम आयोजीत होणार आहे.

हेही वाचा

सुनीता आहुजा गोविंदाला घटस्फोट का देत नाहीत? राखी सावंतसोबतच्या कॉलवर सुनीताचा मोठा खुलासा

हे देखील वाचा