आजकालच्या तरुणांची वाढदिवस साजरा करण्याच एक वेगळच पद्धत सुरू झाली आहे. पार्टी देणे, डिजे लावून त्यासमोर नाचने असे प्रकार सध्या सुरू आहेत. पण मुंबईतील शिवाजी नगर येथील गोवंडी परिसरात 20 वर्षीय मुलाची वाढदिवसाच्या दिवशी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साबीर अन्सारी असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस साजरा करायला गेलेला साबीर घरी परत आलाच नाही. मित्रांनीच मिळून साबीरची ह’त्या केली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, साबीरचा वाढदिवस होता. त्यादिवशी सर्व मित्र मिळून बाहेर पार्टीसाठी गेले होते. त्यांनी हाॅटेलमध्ये जेवण केल. जेवणाच बिल 10,000 रुपये आल होत. त्यावेळी सगळे बिल साबीरने भरले पाहिजे असा मित्रांचा हट्ट होता. पण साबीर बिल भरण्यासाठी तयार नव्हता. साबीरने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी बचत करत असल्याचे सांगून नकार दिला. मात्र, आरोपीनीं पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने जेवणाचे संपूर्ण बिल भरले.
वाढदिवसासाठी डीजे लावण्यासाठी आणि केक घ्यायचा असल्याने साबीरने काही आरोपींकडे पैसे मागितले. मात्र, आरोपींनी पैसे दिले नाहीत. या मुद्द्यावरून साबीर आणि त्याच्या मित्रांमध्ये भांडण झाले. त्यानंतर त्याच्या वाढदिवसाच्याच्या दिवशी आरोपींनी काही पैसे गोळा केले. त्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोवंडी येथील शिवाजी नगर येथील आंबेडकर गार्डन परिसरात त्यांंनी पार्टी केली. रात्री 11:30च्या सुमारास, आरोपीने साबीरचे जॅकेटने धरले आणि हाणमार केली.
त्यानंतर एकाने केकमधील चाकू हिसकावून घेतला आणि साबीरवर सपासपा वार केले. या आरोपींनी सलमान खानच्या ‘अंतिम’ चित्रपटातील सीनची आठवण करून दिली आहे. साबीरला चाकू मारण्यापूर्वी एका आरोपीने “इसको अंतिम फिल्म के शॉट दिखाओ” असेही म्हटले आहे. या प्रकरणी आता शाहरुख आणि निशार या दोन आरोपींना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तर दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. (20 Majhi Mulachi’s 4 Friend Murders, Killing Talking Scenes In Salman’s ‘That’ Movie)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; युजर म्हणाले, “निर्लज्जपणा…”
‘तारक मेहता…च्या सेटवर इतका छळ झाला की..’, ‘तारक मेहता…’च्या ‘बावरी’ने केला धक्कादायक खुलासा