Friday, March 29, 2024

भाईजानसाठी वेडीपिसी झालेली ‘ही’ अभिनेत्री पुढे आयुष्यभर राहिली अविवाहित

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान. एक उत्कृष्ठ अभिनेता यासह एक चांगल्या मनाचा माणूस म्हणून भाईजान सलमान याची जनमाणसात ओळख आहे.

सलमान खान याच्या व्यावसयिक जिवनाइतकीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याची सर्वत्र नेहमीच चर्चा होत असते. यातही वयाची पन्नाशी ओलांडलेला सलमान अद्यापही अविवाहित असल्याने त्याच्या लग्नाबाबत नेहमीच चर्चा सुरू असते.

सलमान अद्याप अविवाहित आहे मात्र, चित्रपट सृष्टीत काम करत असताना इतकी वर्ष त्याच्यानावसोबत अनेक अभिनेत्रींची नावे जोडली गेलीत. किंबहुना त्याच्या विविध अभिनेत्रींसोबतची प्रेमप्रकरणे, रिलेशनशिप यांची चर्चा आजही होत असते.

आज आम्ही दैनिक बोंबाबोंबच्या प्रेक्षकांना एका अशा नावाची ओळख करून देणार आहोत, ज्या अभिनेत्रीने सलमानसाठी आपलं आख्खं आयुष्य वाहिलं असून अद्यापही त्याच्यामुळे ती अविवाहित आहे.

सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले आहे. मात्र, मुळची पाकिस्तानची असलेली अभिनेत्री आणि मॉडेल सोमी अली हीच्याबाबत मात्र आज आपण चर्चा करणार आहोत.

सोमीची आई इराकी आणि वडील पाकिस्तानी आहेत. १२ वर्षांपर्यंत सोमी पाकिस्तानात शिकली. यानंतर आपल्या पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली. सोमीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये करियर करायचे होते. पण ती बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्रश होते. ‘मैंने प्यार किया’ पाहिल्यानंतर सलमानसोबतच लग्न करायचे, असे तिने ठरवले होते.

सोमीचा कल बघून तिच्या आईने तिला मुंबईला पाठवले. पण सोमीला बॉलिवूडपेक्षाही सलमान हवा होता. खरे सांगायचे तर सलमानचा पिच्छा करत करतच ती फ्लोरिडावरून मुंबईत पोहोचली होती. यावेळी ती केवळ १६ वर्षांची होती.

मुंबईत आल्या आल्या तिने मॉडेलिंग सुरू केले आणि मग बॉलिवूडमध्ये संधी शोधत राहिली. ही ती संधी होती, ज्याद्वारे ती सलमानपर्यंत पोहोचू शकणार होती. अखेर तिची ही इच्छा पूर्ण झाली. चित्रपटात काम करत असताना एक दिवस ती सलमानला भेटली.

सलमान आणि सोमी आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सोमीने १९९१ ते १९९७ या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. १९९९ मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रेकअपनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही.

सन २००६ मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था स्थापन केली. वयाच्या पाचव्या वर्षी सोमीवर लैंगिक अत्याचार झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते. आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत. सोमी कदाचित आजही सलमानवर तेवढेच प्रेम करते. म्हणूनच आजपर्यंत ती अविवाहित आहे.

हे देखील वाचा