अशाप्रकारे प्रपोज केलेलं कुणी पाहिलंय का? नसेल तर पाहा अंकिता लोखंडेचा हा देखणा व्हिडिओ


फेब्रुवारी महिना लागला की सगळ्यांना वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. नुकताच व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरु झाला आहे. प्रत्येक प्रियकर आणि प्रियासी यादिवशी आपले प्रेम समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करत असतात. या दिवसाचे अप्रूप सामान्यांपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सर्वानाच असते. याच व्हॅलेंटाईन आठवड्याच्या निमित्ताने अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

टीव्ही आणि चित्रपटांमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिता कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, कधी खासगी आयुष्यामुळे तर कधी व्यायसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिच्या पर्सनल गोष्टी फॅन्ससोबत शेयर करताना देखील दिसत असते.

नुकताच अंकिताने प्रपोज डेच्या निमित्ताने एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेसवर ‘मनवा लागे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्याच्या माध्यमातून तिने विकी जैनला प्रपोज केले आहे. तिने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, “किसी का तो होगा ही तू, क्यों न तुझे मैं ही जीतूं, विक्की जैन.हॅपी प्रपोज डे.”

अंकिताचा डान्स तिचे एक्सप्रेशन हे सर्व नेटकऱ्यांना आवडत असून, तशा कमेंट्स देखील तिला मिळत आहे. पण यातही ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स तिला खूप ट्रोल करत आहेत. काहींनी कमेंटमध्ये लिहीले की, “अंकिता आता सुशांतला त्याच्या मृत्यूला विसरून पुढे गेली आहे, आणि ती तिचे जीवन आनंदाने जगत आहे.”

काहींनी ‘सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी अंकिताने प्रयत्न करणे बंद केल्याचे देखील लिहिले आहे’, असे लिहिले आहे. ही काय पहिलीच वेळ नाही जेव्हा अंकिता ट्रोल होत आहे. याआधी देखील ती तिच्या बर्थ डे पार्टीमुळे तर कधी तिच्या गोवा ट्रिपमुळे ती ट्रोल झाली होती.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, मात्र काही काळाने त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर सुशांत रिया चक्रवर्तीसोबत तर अंकिता विकी जैनसोबत नात्यात होते. मागच्या वर्षी जून २०२० मध्ये सुशांत त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.