‘…मैं भी हो गई लाल’, मौनीने शेअर केला लाल रंगाच्या पंजाबी ड्रेसमधील फोटो, मिळतायत भारी कमेंट्स


टीव्ही मालिकेपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली जबरदस्त ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजेच ‘मौनी रॉय.’ सध्या ती सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे. आपल्या हॉट अंदाजातील फोटो शेयर करणारी ही अभिनेत्री आपल्या फोटोंनी सर्वांनाच वेड लावत असते. तिचा कोणताही फोटो असो, चाहत्यांच्या पसंतीस पडल्याशिवाय राहत नाही. आपल्या सुंदर आणि कातिल अशा अदांनी प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडेल अशी आहे ही अभिनेत्री. बऱ्याचदा आपले ग्लॅमरस फोटो ती आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मौनी रॉयचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत असतात. नुकताच तिने आपला एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. लाल रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेयर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘लाल मेरे लाल की जित देखू उत लाल, लाली देखन मैं गयी मैं भी हो गयी लाल…”

मौनी कपूरचा हा फोटो तिच्या चाहत्यांना इतका आवडला आहे की, न चुकता ते तिच्या फोटोवर कमेंट करत आहेत. तिचे साडीमधील फोटो असो वा बिकिनीमधील, प्रत्येक फोटोतील तिचे सौंदर्य चाहत्यांना भूरळ पाडतात. इंस्टाग्रामवर तिचे १६ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. इतकेच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळात देखील तिने आपले नवनवीन फोटो प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. ते फोटोदेखील खूप व्हायरल झाले होते.

मौनीचा जन्म १८ सप्टेंबर १९८५ साली पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये झाला होता. आपले शालेय शिक्षण तिने पश्चिम बंगाल म्हणून घेतले होते. त्यानंतर दिल्लीच्या मिरांडा हाउसमधून तिने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. लहानपणापासूनच तिला अभिनेत्री व्हायचे होते.

मौनीने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सरपासून केली होती. पहिल्यांदा ती ‘रन’ या चित्रपटातील एका गाण्यात डान्स करताना दिसली होती. सर्वप्रथम ती एकता कपूरच्या ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ या कार्यक्रमात दिसली होती. आपल्या ‘देवो के देव महादेव’ या कार्यक्रमातून ती घराघरांत पोहचली. यानंतर तिने ‘नागिन’, ‘नागिन २’, ‘कस्तुरी’, ‘जुनून ऐसी नफरत’ अशा कार्यक्रमामधून अभिनय केला आहे. २०१८ साली अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या सिनेमामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘रोमियो अकबर वॉल्टर’, ‘मेड इन चायना’ या चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवली आहे. लवकरच ती आपल्या ‘ब्रह्मस्त्र’ या चित्रपटातून अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलfया भट्ट यांचासोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे.

मध्यंतरी ती दुबईमधल्या एका बँकरसोबत लग्न करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्याचे नाव सुरज नांबियार असे आहे. लॉकडाऊन काळात ती अनेक महिने दुबईमध्ये होती. तिची बहीण दुबईला राहते आणि याच ठिकाणी तिची आणि सुरजची ओळख झाली होती. परंतु याबाबत तिने अद्यापही काहीच वक्तव्य केले नाही आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-मराठमोळ्या तेजस्विनीचा बोल्ड लूक पाहून ‘या’ अभिनेत्याचा ‘कलेजा खल्लास…’, एकदा पाहाच

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा


Leave A Reply

Your email address will not be published.