मराठमोळ्या तेजस्विनीचा बोल्ड लूक पाहून ‘या’ अभिनेत्याचा ‘कलेजा खल्लास…’, एकदा पाहाच

Tejaswini pandit share her bold and hot photo on Instagram


आपल्या सालस आणि सोज्वळ सौंदर्याने प्रत्येकाच्या मनामनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ‘तेजस्विनी पंडित.’ टीव्ही मालिकेमधून ती घराघरात पोहोचली आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केले. ‘तुझ नी माझं घर श्रीमंतांच’ स्टार प्रवाह वरील या लोकप्रिय मालिकेने तेजस्विनीला चांगलीच ओळख दिली.

अनेक मराठी टीव्ही मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून आपण तेजस्विनीला साध्या भूमिकेत पाहिले आहे. पण तिचा हॉट आणि बोल्ड लूक कसा असेल याचा कोणाला अंदाज तरी आहे का? तेजस्विनीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या बोल्ड लूकमधील एक फोटो पोस्ट केला आहे. तिचा हा अंदाज पाहून तिच्या चाहत्यांचे अक्षरशः डोळे फिरले आहे.

तेजस्विनीने काळया रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो बॅक साईडने काढला आहे. संपूर्ण प्लेन काळया रंगाची साडी आणि तिला सोनेरी रंगाची बॉर्डर देखील आहे. तसेच बॅकलेस ब्लाऊज घातला आहे. या फोटोमध्ये तिने एका हातात बांगड्या, कानात झुमके असा सगळा साज शृंगार केला आहे. यामध्ये ती केसात गुलाबाचे फुल माळताना दिसत आहे. या काळया रंगाच्या साडीमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

बॅकलेस ब्लाऊजमुळे तिच्या पाठीवरचा टॅटू देखील दिसत आहे. हा सगळ्यात लोकप्रिय ‘हॅन्ड ऑफ फातिमा’ चा टॅटू आहे. हा टॅटू सत्ता, ताकद आणि सुरक्षितता संबोधित करतो. महिलांना प्रोत्साहन देणारा हा टॅटू आहे. तसेच हा टॅटू इस्लामचे पाच पिलर संबोधित करतो.

हा फोटो शेअर करून तिने असे कॅप्शन दिले आहे की, “Tall, thin, curvy, short- whatever you are, you are beautiful.” तिच्या या फोटोला चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. यादरम्यान मराठमोळा अभिनेता उमेश कामतने तिच्या या फोटोवर ‘कलेजा खल्लास झाला’ अशी कमेंट करून, तिच्या सौंदर्याचे वर्णन केले आहे.

याव्यतिरिक्त तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. तिला या फोटोंवरून चाहत्यांनी धारेवर धरले. परंतु तेजस्विनीनेही त्यांनी कमेंट करून सडेतोड प्रत्युत्तर दिले.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अग बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले.तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-‘मिर्झापूर’ वेबसीरिजनंतर श्रिया पिळगावकर ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार पत्रकाराची भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.